संकटं शेतकऱ्यांची पाठ सोडत नाही! गोगलगाय पाठोपाठ कोवळ्या पिकांवर हरणांचा ताव
लोकगर्जना न्यूज
आडस : शंखी गोगलगायचे संकट टळताना दिसत असताना कोळ्या पिकांवर हरणांचे कळप ताव मारत आहेत. यामुळे आडस परिसरातील शेतकरी मेटाकुटीला आला असून वण विभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे.
शेतकरी अन् संकटं या एक नाण्याच्या दोन बाजू म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कधी पाऊस नाही म्हणून तर कधी पाऊस जास्त झालं म्हणून पीक हातचे जातात. पीक आली तर दर मिळत अन् दर वाढतेत तेंव्हा शेतकऱ्यांच्या पदरात काहीच नसतं.यावर्षी तर शंखी गोगलगायने रातोरात कोवळी पिके फस्त करुन झोपच उडवली आहे. याबाबतीत ओरड झाल्यानंतर कृषी सहायकापासून ते कृषी आयुक्त खडबडून जागे झाले. याबाबतीत कृषी विद्यापीठ, कृषी तंज्ञांनी मार्गदर्शन केले. तसेच पाऊस ही कमी झाल्याने व शेतकऱ्यांनी सर्व उपाययोजना केल्याने गोगलगायचे संकट काहीसे निवळल्याचे दिसून येत आहे. हा काहीसा ताण कमी झाला तर पाऊस कमी होताच हरणांचे कळप फाडात शिरले आहेत. एका-एका कळपात लहान मोठे ५० हरण असतील. ते कोवळे सोयाबीनवर ताव मारुन फस्त करत आहेत. तसेच त्यांच्या फिरण्याने पिकांची नासाडी होत आहे. गोगलगायला अनेक उपाय सुचवले व त्यांना वेचून विल्हेवाट लावली पण या हरणांचे काय करावे? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे हरीण, रानडुक्कर सह पिकांची नासाडी करणाऱ्या वन्य प्राण्यांचे वण विभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे.