शेवटच्या टप्प्यातही कापसाची दरवाढ सुरुच;पहा आजचे विक्रमी दर काय?
लोकगर्जना न्यूज
कापसाचा हंगाम संपण्याच्या मार्गावर असून दरवाढ मात्र सुरुच आहेत. आज कापसाला प्रतिक्विंटल ११ हजार ५०० रुपये दर मिळाला आहे. अतिवृष्टीमुळे झालेलं कापसाचं नुकसान काही अंशी भरून निघाल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत.
कोरडवाहू जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात कापसामुळे चार पैसे पहाता आले. सायकल वरील शेतकरी मोटारसायकल वर आलं. यामुळे कापसाला पांढरं सोनं म्हणून ओळखले जाऊ लागले. हे पीक खरीप हंगामातील प्रमुख पीक ठरत असे. परंतु नियमित कापूस लागवड तसेच फर्तड घेणं यामुळे कापसावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला याचा परिणाम उत्पादनावर झाला. तसेच लागवडी पासून ते वेचणी पर्यंत लागणारे मनुष्यबळ, फवारणीचा खर्च ताळमेळ लागत नसल्याने शेतकरी सोयाबीन पीकाकडे वळला. गेल्या हंगामातील तुरळक शेतकऱ्यांनी कापूस लागवड केली. त्याही शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे फटका बसला असून, काही बोंड पावसामुळे सडली तर बोंड अळीने काही फस्त केली. त्यामुळे प्रति बॅग यावर्षी कापसाला तीन ते अडीच क्विंटल असा उतार आलं. परंतु यावर्षी कापसाला पहिल्या दिवसापासून ८ हजारांच्या पुढे दर मिळाला. ते वाढत जाऊन तब्बल ११ हजार ५०० रु. आला आहे. आज बुधवारी ( दि. २३ ) आडस येथील स्थानिक व्यापाऱ्यांनी ११५०० दराने कापूस खरेदी केला. तसेच धारुर कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत असलेल्या विश्वतेज जिनिंग खोडस ( आडस ) ११ हजार १११, बालाजी जिनिंग फ. जवळा ( दिंद्रुड ) ११ हजार २०६, नर्मदा कोटेक्स भोपा ११ हजार, लक्ष्मी व्यंकटेश भोपा ११ हजार ७ रु. असे प्रतिपादन क्विंटल कापसाचे विक्रमी दर मिळत आहेत. विशेष म्हणजे मागील अनुभव पहाता हे उल्ट दिसत असून, हंगामात शेवटच्या टप्प्यात असताना दरवाढ होत आहे. यामुळे कापसाला भविष्यात असेच दर राहिले तर शेतकऱ्यांच भलं होईल परंतु उत्पादन ही वाढलं पाहिजे याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.