शेतकऱ्यांसाठी म्हत्वाचे! पीक विमा भरला असेलतर सुकत असलेल्या पिकांची ऑनलाईन नोंद करा
लोकगर्जना न्यूज
बीड : पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील खरीप पिके जळून जात आहेत. त्यामुळे प्रधान मंत्री पीक विमा योजनेत सहभागी असलेल्या शेतकऱ्यांनी क्रॉप इन्शुरन्स हे ॲप डाऊनलोड करुन त्यामाध्यमातून पावसाअभावी नुकसान झालेल्या पिकांची नोंद ( तक्रार ) करावी. जर ऑनलाईन तक्रार असेलतर पीक विम्याचा क्लेम मिळेल.
बीड जिल्ह्यात मागील २५ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. तसेच सुर्य आग ओकत असल्याने वातावरणात मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण झाली आहे. यामुळे सोयाबीन, उडीद, मूग, कापूस सह आदि पिकं पाण्याविना करपून गेली आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे ते पाणी देऊन पिके जगविण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु वीजपुरवठा चालत नसल्याने त्यांचे हे प्रयत्न निष्फळ ठरले आहे. तब्बल २५ दिवस झाल्याने पाऊस नसल्याने सोयाबीनची मोठी फुलं झड झाली आहे. शेंगा लागण्याच्या काळात पीक करपून गेलं आहे. आता पाऊस झाला तरीही या करपलेल्या पिकांना काहीच फायदा नाही असे शेतकरी सांगतात. हे झालेलं नुकसान तर भरुन निघणार नाही परंतु बुडत्याला काडीचा आधार म्हणतात तसे ज्या शेतकऱ्यांनी खरीप पीक विमा भरला त्यांनी प्लेस्टोर वरुन क्रॉप इन्शुरन्स हे ॲप डाऊनलोड करुन घ्यावं. या माध्यमातून शेतात जाऊन सुकलेली पिकांचे फोटो व क्षेत्राची माहिती भरावी. अशा प्रकारे ऑनलाईन तक्रार असेलतर पीक विम्याचा क्लेम मिळेल. त्यामुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने तक्रार करावी याबाबत जिल्हाधिकारी यांनीही २५ टक्के ॲग्रीमसाठी सर्वे करण्याचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांनी याबाबत संपर्कातील माहिती असणाऱ्या व्यक्तींशी अथवा कृषी विभाग व विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून माहिती घ्यावी.