भवताली

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोयाबीनचे भाव वाढले

 

लोकगर्जना न्यूज

मध्यंतरी सोयाबीनचे दर स्थिर होते परंतु मागील काही दिवसांपासून पुन्हा सोयाबीन दरांनी उसळी घेतली असून दररोज ५० ते १०० ने दरवाढ सुरू आहे. आज बुधवारी प्रतिक्विंटल ६९०० ते ७००० हजारांवर दर गेले आहेत. यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. परंतु ही दरवाढ कधीपर्यंत सुरू राहील की, कमी होईल याबाबत अधिकृत कोणीही सांगत नसल्याने शेतकऱ्यांनी बाजारांवर लक्ष ठेवून आपल्या मालाच्या विक्री संबंधी निर्णय घ्यावा.

यावर्षी खरीप हंगामात सर्वाधिक पेरणी झाल्याने सोयाबीन प्रमुख पीक ठरले आहे. यावरच शेतकऱ्यांची पुर्ण मदार आहे. गतवर्षी मिळालेल्या ११ हजार प्रतिक्विंटल दरामुळे सोयाबीन पिकांवर शेतकऱ्यांच्या मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु नवीन सोयाबीन पदरात पडताचा भाव घसरण्यास सुरुवात झाली. मात्र सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सावध पवित्रा घेत सोयाबीन विक्री न करता साठवून ठेवणे पसंत केले. आवक नसल्याने बाजारावर एक प्रकारे दबाव निर्माण झाले. सुरवातीला चांगले भाव होते. काही दिवस प्रतीक्षा करुन ही भाववाढ होत नसल्याने गरजु शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री करण्यास सुरुवात केली. ७ हजारांच्या पुढे असलेले भाव बाजारात आवक सुरू होताच घसरण्यास सुरुवात झाली. आपल्याकडील शेतकरी म्हणजे पेरणीसाठी लागणारे बियाणे,खत हे उधारी वर घेतो तसेच इतरही काही कामे पीक निघाले की, विकून देतो या वायद्यावर सर्व व्यवहार करतो. त्यामुळे जास्त दिवस वाट पाहणे प्रत्येक शेतकऱ्याला शक्य नाही. त्यामुळे टळतय तोपर्यंत शेतकऱ्यांनी माल रोखून धरलं परंतु समोरील व्यक्ती ऐकून घेत नसल्याने सोयाबीन मिळेल त्या दराने विक्री केला. परंतु मागील काही दिवसांपासून पुन्हा सोयाबीन दरवाढ सुरू झाली आहे. जगातील सर्वाधिक उत्पादन घेणारं ब्राझील मध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे सोयाबीन न आल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. तसेच सोयाबीनचा सर्वात मोठा देश चीन ओळखले जाते ते आता अमेरिकेतून सोयाबीन आयात करत आहे. तसेच सर्वत्र मागणी वाढली असल्याने दरवाढ सुरू असल्याचे सांगितले जात आहे. परंतु ब्राझील मध्ये सोयाबीन काढणीला सुरवात झाल्याचेही वृत्त आहे. आपल्याकडील विचार केला तर, सोयाबीन पेरणीपूर्वी व नंतर चांगल्या प्रकारे पाऊस झाला. यामुळे सोयाबीन चांगलेच बहरली होती. परंतु फुले लागण्याच्या वेळीच पावसाने ओढ दिल्याने फुले गळून पडली तसेच पीक काढणीस तयार झाले तेव्हा अतिवृष्टीमुळे नुकसान झाले. यामुळे आपल्याकडील सोयाबीनला फटका बसला. त्यामुळे आपल्याकडे ही उत्पादन घटले आहे. घटते उत्पादन पहाता नेमके बाजारात भाव का पडले होते? हे एक कोडे आहे. मात्र आता भाववाढ सुरू असून आजचा विचार केला तर लातूर येथील एडीएम ( टिना ) मिलचा ७ हजार प्रतिक्विंटल तर किर्ती मिलचा ७ हजार ३०० असा दर आहे. अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर खरेदी दर ही ६ हजार ८०० ते ६ हजार ९०० असा सात हजारांच्या घरात दिसून आले. हे वाढते दर पहाता शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत. बाजारात ही सोयाबीनची आवक वाढल्याचे व्यापारी, आडते सांगत आहेत. हे दर पुढे कसे वाढतील अथवा घटतील हे सक्षमपणे सांगत नाही. येत्या काळात उन्हाळी सोयाबीन ही बाजारात येणार आहे. त्यामुळे याचा बाजारावर काय परिणाम होईल हे ही आत्ताच अंदाज बांधणे शक्य नाही. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी बाजारावर लक्ष ठेवून व अभ्यास करुन आपल्या माल विक्रीचा निर्णय घ्यावा असे मत व्यक्त केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »