शेतकऱ्यांवर संकट कोणत्या दिशेने येईल सांगणं कठीण आगीमध्ये शेकडो एकर ऊस जळाल्याने मोठं आर्थिक नुकसान
लोकगर्जना न्यूज
शेती आणि शेतकऱ्यांच्यी अवस्था सध्या बिकट असून, त्यात संकटाची कमी नाही. कोणत्या दिशेने आणि काय? संकट येईल आणि हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाईल हे सांगणे कठीण आहे. आज सौंदना ( ता. केज ) शिवारात आगीच्या रुपात आलेल्या संकटाने ३० ते ३२ शेतकऱ्यांच शंभर ते दीडशे एकर ऊस फस्त केले. रात्रीचा दिवस करून जगलेले पीक डोळ्या देखत जळत असताना शेतकरी काहीही करु शकला. तालुका प्रशासनाने अग्नीशामक दल पाठवलं परंतु वणवा पेटलेला असताना नजर जाते तिथपर्यंत आगच दिसत असल्यामुळे नाविलाज झालं. या आगीमुळे मोठं आर्थिक नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ या लहरीपणामुळे तर, पीक चांगले येते परंतु दर मिळत नाही. हे पहाता शेती डब घाइला आली आहे. शेतकरी कंगाल झाला आहे. मागील दोन वर्षांपासून पावसाने मेहरबानी केल्यामुळे जिल्ह्यातील लहान, मोठ्या तलावात जलसाठा उपलब्ध आहे. बऱ्याच काळानंतर पाणी दिसत असल्यामुळे शेतकऱ्यांनी चार पैसे मिळतील म्हणून ऊस लागवड केली. परंतु ऊस जास्त झाल्याने तोडच मिळने मुश्किल झाले. कारखान्याचे उंबरे झिजविल्यानंतर कारखाना प्रशासनाकडून लेबर नाही,वाहन नाही, असे कारणं सांगण्यात येत आहेत. ऊसाला तुरे आले परंतु तोड नाही मिळाले. हे चित्र पहाता ऊस जाणार की शेतातच उभा राहतो या चिंतेत शेतकरी आहे. यात आणखी आगीच्या घटनांनी तर झोपच उडाली आहे. मागील महिनाभरापासून ऊसाला आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. याचे कारण विद्युत खांबावरील तारांचे घर्षण सांगितले जात आहे. आज बुधवारी ( दि. १६ ) दुपारी केज तालुक्यातील सौंदना येथे तर आगीने १०० एकरापेक्षा जास्त ऊस बेचिराख करून शेतकऱ्यांच्या मेहनत व स्वप्नांचा चुराडा केला. याही आग लागण्याचे कारण महावितरण कंपनीच्या विद्युत तारांचे घर्षण सांगितले जात आहे. घर्षण होऊन आगीच्या थिनग्या उडून ऊसाला दुपारच्या सुमारास आग लागली. पहाता-पहाता आग वाढत रौद्ररूप धारण केले. शेकडो एकर वरील ऊस आपल्या कवेत घेतलं. ही घटना तालुका प्रशासनास कळविण्यात आली. तहसीलदार दुल्हाजी मेंडके यांनी दखल घेत तातडीने घटनास्थळी अग्नीशामक दल पाठवलं.परंतु पहाताल तिथं पर्यंत आगच दिसत असल्यामुळे ते विझविणं शक्य नाही झाले. पहाता पहाता ऊसाचे चिपाड झाली. या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.