कृषी

शेतकऱ्यांनो नुकसान भरपाई,पीक विमा मिळवायचा असेल तर इ पीक पाहाणी करा;२२ तारखेपर्यंत संधी

लोकगर्जनान्यूज

केज : ई-पीक पाहाणी साठी मुदतवाढ देण्यात आली असून, शेतकऱ्यांसाठी शेवटची संधी आहे. अन्यथा जमीन पडीक समजून कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे २२ ऑक्टोबर ही शेवटची तारीख असल्याने त्या आधी ई-पीक पाहाणी करुन घ्यावी असे प्रशासनाकडून आवाहन त्यांनी येत आहे.

नुकसान अनुदान, पीक विमा,पीक कर्ज या सर्वांसाठी ई-पीक पाहाणी आवश्यक आहे. जर शेतकऱ्यांनी ई-पीक पाहाणी केली नाही तर जमीन पडीक समजण्यात येईल अथवा शासनाच्या पोर्टलवर ती पडीक दिसेल. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने ई-पीक पाहाणी व्हर्जन २ या मोबाईल ॲप डाऊनलोड करावा. यावरून ऑनलाईन ई-पीक पाहाणी करुन घ्यावी. ही शेवटची संधी ठरणार आहे. यामुळे २२ ऑक्टोबर ही शेवटची तारीख असून तोपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याने ई-पीक पाहाणी करावी असे आवाहन प्रशासन व सामाजिक कार्यकर्ते किसान प्रेमी शिवरुद्र आकुसकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »