शेतकऱ्यांना आधुनिक ( Modern Farmers ) करण्यासाठी गणेश चिरकेंची धडपड!
केज तालुक्यातील शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा केला
केज : पारंपारिक शेतीला बगल देऊन शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी शेतकरी आधुनिक ( Modern Farmers ) व्हावा या उद्देशाने तालुक्यातील माळेगाव येथील श्री गणेश ट्रेडर्स चे संचालक गणेश चिरके यांच्या वतीने जळगांव स्थित ‘जैन इरिगेशन सिस्टिम्स’ या सुप्रसिध्द कंपनीत (दि७ व८फेब्रुवारी)दोन दिवशीय शेतकरी अभ्यास दौरा पार पडला.
आज प्रत्येकजण हायटेक आधुनिक होत आहे. परंतु आर्थिक बाजु कमकुवत असल्याने तसेच प्रत्येक्ष आधुनिक शेती पहाण्यात न आल्याने आपल्याकडील शेतकरी आहे त्यात समाधान मानत पारंपरिक शेती करत आहे. परंतु यामुळे प्रगती होत नाही. शेतकऱ्यांना प्रगत करायचे असेल तर त्यासाठी आधुनिक शेतीची कास धरून हायटेक व्हावे लागेल म्हणून गणेश चिरके यांनी हा दोन दिवसांचा तरुण शेतकऱ्यांसाठी अभ्यास दौरा आयोजित केली. यामध्ये माळेगाव,साळेगाव,गोटेगाव,सुकळी,दीपेवडगाव, सुर्डी सोनेसांगवी या गावातील ६० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी या अभ्यास दौऱ्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. पीक प्रात्यक्षिक,सूक्ष्म सिंचन पद्धती,कांदा लागवड,केळी, आंबा फळबाग लागवड व संगोपनचे महत्त्व सांगितले आणि नाविन्यपूर्ण पद्धतीने कमी पाण्यावर व कमी खर्चात शेकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या फायदेशीर प्रयोग दाखवून तज्ञांनी सविस्तर असे मार्गदर्शन केले.यावेळी जैन हायटेक प्लांट फॅक्टरी,जैन टिशू कल्चर, जैन प्लास्टिक फॅक्टरी,जैन हिल या ठिकाणी भेटी देऊन शेतकऱ्यांनी माहिती जाणून घेतली.
पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतात कसा वापर होऊ लागला आहे.नवीन पीक पद्धती ची माहिती शेतकऱ्यांना व्हावी यासाठी या अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले होते असे श्री गणेश ट्रेडर्स चे मालक गणेश चिरके म्हणाले.अभ्यास दौरा यशस्वी होण्यासाठी जैन इरिगेशन सिस्टिम्स चे मार्केटिंग हेड एस.एन.पाटील , मॅनेजर भोसले व अवचार यांचे सहकार्य लाभले.