शेतकऱ्यांचे तीन-तीन महिने पैसे न देणारे लोकनेते कसे अन् त्यांना झोप ही येते ! धनंजय मुंडे कडून पंकजा मुंडेवर टीका

लोकगर्जना न्यूज
कारखाना पैसे कमावण्यासाठी नव्हे तर शेतकरी व लोककल्याणासाठी किरायाने घेतला असून ऊसाचा दरही एफआरपी पेक्षा जास्त दिला. परंतु ज्यांना वारसाहक्काने कारखाना मिळाला त्यांनी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे तीन-तीन महिने पैसे अडकून ठेवले ते म्हणे लोकनेते, शेतकऱ्यांचे पैसे अडकून ठेवून त्यांना झोपही कशी येते ? असे म्हणत नाव न घेता सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी माजीमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली. मुंडे हे अंबा साखर कारखाना, व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस प्रा. लि. गळीत हंगाम २०२१-२२ सांगता प्रसंगी बोलत होते.
अंबाजोगाई येथील अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना, व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीने चालवण्यासाठी घेतला आहे. हा त्यांचा पहिला गळीत हंगाम होता. उशिरा चालु करुन ही कारखान्याने तब्बल २ लाख ११ हजार मेट्रिक टन इतके गाळप केले. या २०२१-२२ गळीत हंगामाची सांगत आज रविवारी ( दि. २९ ) करण्यात आली. यावेळी बोलताना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, साखर कारखाना म्हटले की, मला धसकी भरायची कोणालाही विचारलं की, प्रत्येकजण म्हणायचं काही ही कर पण कारखान्याच्या नादी लागू नकोस, चालविणे खूप अवघड आहे. पण त्यांचे दरवर्षी एक-एक कारखाना वाढतं आहे. त्यामुळे जे होईल ते म्हणत मी अंबा साखर चालविण्यासाठी घेतला. संकटाच्या काळात तब्बल २ लाख ११ हजार मेट्रिक टन इतके गाळप केले. शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला हेच समाधान आहे. पैसा कमविण्यासाठी कारखाना चालविण्यास घेतला नसून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी हा कारखाना चालविण्यास घेतला. पहिलीच वेळ असताना यशस्वी हंगाम पुर्ण करुन शेतकऱ्यांना एफआरपी पेक्षा जास्त दर देणार हे फहाता मलाही कारखाना समजतोय हे लक्षात आले. पण काहींना वारसाहक्काने कारखाना मिळाला त्यांची काय अवस्था आहे. शेतकऱ्यांनी ऊस देऊन तीन-तीन महिने झाले त्यांचे बील निघाले नाही. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचे बील न देता यांना झोपाही कशा येतात अन् बीलं थकवून ही ते लोकनेते म्हणे अशी टीका धनंजय मुंडे यांनी नाव न घेता पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली. तसेच आपला जन्म संस्था बुडविण्यासाठी नव्हे तर लोककल्याणासाठी झाल्याचा आहे म्हणत टोला लगावला आहे. दोन दिवसांपूर्वी म्हणे काही शेतकऱ्यांची बील काढली पण तेही १५०० ने अन् आपल्या गळीत हंगामची सांगता असल्याने टीका होईल म्हणून हे ही सांगण्यास मुंडे विसरले नाही. या वर्षी कारखाना दररोज २ हजार मेट्रिक टन ने चालला पुढच्या वर्षी जास्त क्षमतेने ३५ शे ते ३८ शे प्रति दिवस असा कारखाना चालेल. डिसलरी क्षमताही वाढविणार असल्याचे म्हटले. तसेच कोरोना काळात सामान्य जनतेला चांगल्या प्रकारे आरोग्य सेवा मिळावी म्हणून स्वाराती रुग्णालयासाठी १०० कोटी खर्च करण्यात आले. ही आठवण करून देत तीन दिवसांत येथील एमआरआय मशीन सुरू होईल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी कार्यासाठी अनेक मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती. तसेच ऊस उत्पादक शेतकरी, सभासद नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.