शेतकऱ्यांचा अपेक्षा भंग; सोयाबीन, कापसाचे दर घसरले

लोकगर्जनान्यूज
केज : परतीच्या पावसाने व अनुदान न आल्याने शासनाने सरकारला मारलं पण चांगले दर मिळतील अन् पीक तारेल अशी शेतकऱ्यांना आशा होती. परंतु मागील काही दिवसांपासून सोयाबीन व कापूस या दोन्ही महत्त्वाच्या पिकांचे दर घसरल्याने शेतकऱ्यांचा अपेक्षा भंग झाले आहे.
यावर्षी खरीप हंगाम शेतकऱ्यांना आव्हानात्मक गेले असेच म्हणावे लागेल. अनेक संकटांवर मात करत शेतकऱ्यांनी पीक वाचवले. परंतु नुकसान मोठे झाले. शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली. परंतु शेतकऱ्यांच्या पदरात काही नुकसान भरपाई अनुदान पडलं नाही. विमा कंपनीने नियमांचा बडगा उगारुन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. संकटात असलेल्या शेतकऱ्यांची मदार पुर्णपणे पिकांवर आहे. त्यात ही सोयाबीन आणि कापूस हे दोन पीक महत्वाचे आहेत. परंतु या दोन्ही पिकांच्या दर घसरले आहेत. ६ हजारच्या जवळ गेलेले सोयाबीन सध्या ५ हजार ५०० ते ३०० वर गेलेले असून तब्बल ५०० ते ८०० रु. उतरले आहेत. १० हजारांच्या घरात पोचलेला कापूस आज ७ हजार ६०० ते ७०० प्रतिक्विंटल वर पोचला असून यातही मोठी घट झाली. दर वाढतील म्हणून सोयाबीनची मळणी व कापसाची वेचणी होऊन दोन्ही पीक घरातच आहेत. दर घसरत असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दर वाढणार की, नाही याकडे लक्ष लागले आहे.