शिक्षण संस्कृती

शेख ताजोद्दीन आणि शेख खालेद यांना राजस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

 

एकाच शाळेवरी सहशिक्षकांना पुरस्कार घोषित झाल्याने ‘ही दोस्ती तुटायची नाही’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

बीड : जय मल्हार सामाजिक प्रतिष्ठान या नामांकित सेवा संस्थेच्या वतीने दिला जाणारा मानाचा आदर्श शिक्षक पुरस्कार सरस्वती मा . व उच्च माध्यमिक विद्यालय, तेलगाव येथिल माध्यमिक शिक्षक शेख ताजोद्दीन आणि शेख खालेद यांना नुकताच जाहिर झाला आहे . या दोन्ही विद्यार्थी प्रिय शिक्षकांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

राज्यातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीना जयमल्हार प्रतिष्ठानच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येते . शेख ताजोद्दीन आणि शेख खालेद या सरस्वती मा . व उच्च माध्यमिक विद्यालय, तेलगावच्या एकाच शाळेवरील सहकारी मित्रांची विद्यार्थ्यांसाठी सणारी तळमळ तसेच विविध कलागुणांना वावा देण्यासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे . या दोन्ही सहकारी मित्रांच्या यशाबद्दल नवगण शिक्षण संस्थेचे सचिव भारतभूषण क्षीरसागर, शिवसेनेचे किसान सेना जिल्हा प्रमुख परमेश्वर सातपुते,जि . प . सदस्य गणपतराव डोईफोडे , राजुजी मचाले , प्राचार्य शिंदे वसंत रामभाऊ, पर्यवेक्षक चवार बालासाहेब, प्रा . महादेव वक्ते , गणेश काशीद , आबेद चाउस, आतिक सर , युनुस सर , राजु सर , खय्युमभाई ( पोलिस ) , सलिम सर , वाजेदभाई गुत्तेदार , आमेर मदनी ( एमएसईबी ) , शेख फयाज सह सर्वव प्राध्यापक , शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व त्यांचे अप्तेष्ठ आदिंनी अभिनंदन केले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »