शिवसेना बीडच्या नव्या जिल्हाप्रमुखाचे नाव निश्चित!
घोषणेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले
बीड
येथील शिवसेना जिल्हाप्रमुख पद मागील काही दिवसांपासून रिक्त असून अनेक इच्छुक मुंबईत तळ ठोकून आहेत. परंतु मातोश्री वरुन योग्य व्यक्तीची चाचपणी सुरू होती. ती आता थांबली असून नव्या जिल्हाप्रमुखाचे नाव निश्चित झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आता घोषणा कधी होणार याकडे जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
बीडचे शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांचं गुटखा साठा प्रकरणी नाव पुढे आल्यानंतर त्यांच्या पदाला स्थगिती देण्यात आली. त्यामुळे बीडचे शिवसेना जिल्हाप्रमुख पद रिक्त आहे. पक्षाकडून नव्या जिल्हाप्रमुखाच्या निवडीची हालचाल सुरू आहे. मागेच जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांना मातोश्रीवर बोलावून घेऊन चर्चा करण्यात आलेली आहे. या पदावर वर्णी लागावी म्हणून जिल्ह्यातील आजी माजी पदाधिकारी मुंबईत तळ ठोकूण होते तर, मातोश्रीवरून योग्य उमेदवाराची चाचपणी सुरू होती. या चाचपणी अंती बीड जिल्हाप्रमुखाचे नाव निश्चित करण्यात आल्याची चर्चा सुरू असून लवकरच घोषणा करण्यात येणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. त्यामुळे नवीन जिल्हाप्रमुख कोण? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.