लोकगर्जनान्यूज
बीड : शिवसेना शिंदे गटाचा बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यास बीड एलसीबीने जामखेड येथून ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.
कुंडलिक खांडेची दोन दिवसांपूर्वी एक ऑडिओक्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. यामध्ये लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना धोका देऊन विरोधी उमेदवाराला पैसा आणि यंत्रणाही पुरविल्याची कबुली दिली आहे. तसेच पालकमंत्री धनंजय मुंडे यांची गाडी फोडण्याचे यासह मराठा आरक्षण संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या बाबतीत एकेरी उल्लेख केल्याचे संभाषण आहे. यामुळे सर्वत्रच या ऑडिओक्लिप मुळे असंतोष पसरला आहे. तेंव्हा पासून कुंडलिक खांडे जिल्ह्यात चर्चेत आला. मुंडे समर्थकांनी कार्यालय फोडल्याची घटना घडली आहे. यापूर्वी कुंडलिक खांडेवर ३०७ चा गुन्हा दाखल आहे. त्यात ते पोलिसांना हवा होता, यानंतर पेठ बीड आणि परळी येथेही गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर बीड पोलीस खांडेच्या शोधात होती. दरम्यान बीड एलसीबीला खांडे जामखेड येथे असल्याची माहिती मिळाली असता तेथून ताब्यात घेतले आहे. यामुळे आता खांडेची उलटी गिनती सुरू झाल्याची चर्चा आहे.