शिवजयंती आणि खा. प्रितम मुुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धा
बीड । प्रतिनिधी
अखंड हिंदुस्थानाचे दैवत,श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त व बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार डॉ.प्रितमताई गोपीनाथराव मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धा पार पडल्या असून, विजयी संघाना बक्षीस वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा चे माजी जिल्ह्याध्यक्ष रमेश पोकळे तर उद्घाटक भाजपा जिल्हा सरचिटणीस अॅड.सर्जेराव तांदळे, चंद्रकांत फड,राजाभाऊ गुजर,डॉ.अभय वनवे,अंबादास गुजर,किरण बांगर संतोष राख,विजय नागरगोजे,हरिभाऊ बांगर,गणेश मिसाळ,दीपक खेडकरआघाव साहेब,खेडकर बापू,बंडूजी जायभाये,सानप सर,आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम तुळजाई नगर मित्र मंडळाने 12 ओव्हर मध्ये 93 धावा काढल्या तसेच विरुद्ध टीमने अतिशय काटे की टक्कर देत 12 ओव्हर मध्ये 90 रन काढले व त्यांचा निसटता पराभव झाला.ही स्पर्धा अतिशय रोमांचक व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.सामना झाल्यानंतर विजेत्या तुळजाई नगर मित्र मंडळ संघास अॅड.सर्जेराव तांदळे यांच्या तर्फे प्रथम बक्षीस रोख 5000/- रुपये,ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला व उपविजेता संघास द्वितीय पारितोषिक 2500/- व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.या मध्ये मॅन ऑफ द मॅच निखिल तावरे यांना दिपक खेडकर यांच्या तर्फे 1100/- व प्रमाणपत्र देण्यात आले.बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झाल्यानंतर उद्घाटक तांदळे यांनी सर्व स्पर्धकांना मोलाचे मार्गदर्शन केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विजय नागरगोजे सर यांनी केले.