शिरूर तालुक्यातील पशुधनाच्या चारा-पाण्याची व्यवस्था करावी -शिवराम राऊत
लोकगर्जनान्यूज
शिरूर का. : तालुक्यात दुष्काळ जन्य परिस्थिती निर्माण झाली. यामुळे जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. यामुळे शासनाने जनावरांच्या चारा पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी शिवराम राऊत यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
बीड जिल्ह्यातील पडलेल्या सरासरी पेक्षा कमी पावसामुळे शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.त्यामध्येच रायमोह कृषिमंडळातील पर्जन्यमान हे अंत्यंत अल्प असल्याने खरीप हंगामातील बाजरी, सोयाबीन, कपाशी,सह सर्व पिके करपून जात असल्याने उत्पादनात ८०%पेक्षा अधिक घट होणारी असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
त्यामध्ये पावसा अभावी विहीर,तलाव, पाणवठे कोरडे पडल्याने मानसाला पिण्यासाठी व पशुधनासाठी पाणी समस्या तीव्र होत आहे.त्या मुळे श्रीनिवास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था हिवरसिंगा यांचे अध्यक्ष श्री.शिवराम राऊत यांनी बीडच्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी महोदयांची भेट घेऊन मौ.हिवरसिंगा, औरंगपूर, मलकाचीवाडी, ढोरकरवाडी सह रायमोह कृषिमंडळातील शेतकऱ्यांच्या जवळ असणारा चारा हा संपत आहे.पावसा अभावी खरिप हंगामातील बाजरी,मका,कडवळ,तसेच शेतातील तनतोडा,गवत, हे निर्माण झाले नाही.पशुधनासाठी असणारे वैरण,सरमाड,अभावी व पाणी टंचाई तून हिवरसिंगा सह मलकाचीवाडी, परिसरातील लहान-मोठे अंदाजे १०००पेक्षा हि अधिक बैल,गायी,म्हैस,वासरे,शेळ्या, सह सर्व पशुधनाच्या रक्षणासाठी शासनाच्या माध्यमातून चारा-व पाण्याची व्यवस्था करणे अंत्यंत अवश्यक असल्याचे श्री.शिवराम राऊत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या.त्याच प्रमाणे कपाशी,तूर या पिकांचे देखील नमुना सर्वेक्षण करून पीकविमा मंजूर करण्यात यावा,चिमटा सर्वे नं.मधील नवीन विद्युत ट्रान्सफॉर्मर साठी मा.ना.धनंजयजी मुंडे यांनी शिफारस केल्याप्रमाणे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी विनंती केली.लवकरच या संबंधीची सर्वोतोपरी व्यवस्था शासनाच्या माध्यमातून होईल.शासनपातळीवर कार्यवाही चालू आहे.असे आश्वासन देण्यात आले.