भवताली
शिफा व तस्बिहा, अहादचा ६ व्या वर्षी पहिला रोजा
लोकगर्जनान्यूज
आडस ( ता. केज ) येथील शिफा, तस्बिहा, अहाद या तीन चिमुकल्यानी आयुष्यातला पहिला रोजा पुर्ण केला. याबद्दल या चिमुकल्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
तीन दिवसांपासून पवित्र रमजान महिना सुरू झाला. या महिन्यात मुस्लिम बांधव निरंकार रोजा ठेवतात. घरातील मोठ्यांचे अनुकरण करत लहान मुलं रोजा ठेवतात. शिफा समीर मुल्ला वय ६, तस्बिहा हज्जु सय्यद वय ६, अहाद मुद्दसीर शेख वय ६ या तीन चिमुकल्यानी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पूर्ण केला. इतक्या कमी वयात त्यांच्या धैर्याचे कौतुक करण्यात येत आहे.