शासनाच्या राज्य शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख घोषित

लोकगर्जनान्यूज
मुंबई : राज्य शासन दरवर्षी शिक्षक दिनाचे औचित्य साधून सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक पुरस्काराने गुणवंत शिक्षकाचा गौरव करतो. या मानाच्या पुरस्कारासाठी राज्यातील शिक्षकांसाठी दि. २५ मे पासून अर्ज ( नाव नोंदणी ) सुरू होणार असल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक यांच्याकडून जाहीर करण्यात आले.
महाराष्ट्र शासन उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकाला शिक्षक दिनाचे औचित्य साधून प्रातिनिधिक स्वरूपात सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक पुरस्कार देऊन गौरव केला जातो. या मानाच्या २०२२-२३ वर्षाच्या पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. या मानाच्या पुरस्कारासाठी दि. २५ मे २०२३ सकाळी ११ पासून ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. याचे शेवटची तारीख १५ जून २०२३ सायं ५ वाजेपर्यंत आहे. यासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व मान्यताप्राप्त अनुदानित खाजगी प्राथमिक/माध्यमिक/ उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांनी दि. १५ जून २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत https://forms.gle/z5mw9A2dTu6J3zyNA या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत असे आवाहन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक पुणे यांनी केले आहे.