कृषी

शाश्वत उत्पन्न देणारी रेशीम ( silk ) शेती करा – जिल्हाधिकारी

तुती लागवडीसाठी मनरेगा अंतर्गत शासकीय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले

लोकगर्जनान्यूज

बीड : तुती लागवड रेशीम हा शेतीपूरक उद्योग असून, रेशीम ( silk ) शाश्वत उत्पन्न देणारी शेती आहे. यामुळे बीड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना फायदा झाला. रेशीम शेतीमुळे जिल्ह्यातील शहरांकडे जाणार लोंढा तसेच अनेकांच्या हातातील कोयता सोडण्यासाठी मदत झाली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी तुती लागवड करुन रेशीम शेती करण्याचे यासाठी शासनाकडून मनरेगा अंतर्गत योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी केले.

काळाची गरज ओळखून शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीऐवजी वेगवेगळे प्रयोग करुन शेती करावी. सध्या शेतीशी निगडीत असलेल्या रेशीम ( silk ) उद्योगातून बीड जिल्ह्यातीलअनेक शेतकरी बांधवांचे जीवनमान उंचावले आहे. या उद्योगातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊन शहरांकडे जाणारा लोंढा तसेच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर थांबवण्यासाठी काही अंशी मदत झालेली आहे. आज काळाची गरज ओळखून शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांऐवजी एकात्मिक शेतीचा विचार करणे गरजेचे झाले. इतर पिकांबरोबरच रेशीम ( silk ) उद्योगासारख्या महिन्याला उत्पन्न देणाऱ्या रेशीम शेती उद्योगाचा विचार करणे व अंमलात आणणे आवश्यक आहे.तरी बीड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी मनरेगा अंतर्गत रेशीम ( silk ) तुती लागवड या योजनेचा लाभ घ्यावा.असे आवाहन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी केले आहे. तुतीच्या झाडाची लागवड केल्यानंतर जवळपास 10 वर्षापर्यंत पाला वापरुन कोष उत्पादन करता येते. रेशीम पिक कमी कालावधीचे असल्यामुळे 25 ते 30 दिवसात एक पीक पुर्ण होते. तसेच ऊसाच्या तुलनेत पाणीही 4 पट कमी लागते.या उद्योगामध्ये असणारे तंत्रज्ञान सोपे, सुलभ असल्याने उद्योग कोणत्याही वयोगटातील स्त्री-पुरूषांना करता येणे सहज शक्य आहे. या उद्योगासाठी साठी जास्त खर्च लागत नाही. कोष विक्रीसाठी राज्यात बाजारपेठ उपलब्ध असून शासना मार्फत कोष खरेदी केली जाते. शून्य खर्चात येणारे पिक – उदा. फवारणी, खते करण्याची गरज भासत नसल्याने या बाबीवर होणारा खर्च व वेळेची बचत होते.
तीन वर्षांपासून बीड जिल्हा प्रथम
रेशीम ( silk ) शेतीत मागील तीन वर्षांपासून बीड जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन जिल्ह्याचा गौरव करण्यात आला.
तुती लागवडीस मनरेगा योजनेतून अनुदान योजना
शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आणणाऱ्या रेशीम शेतीकडे शेतकरी वळला पाहिजे म्हणून शासन मनरेगा योजनेतून तुती लागवडीसाठी अनुदान देत आहे. यासाठी 3 लाख 58 हजार 142 रु. इतकं अनुदान दिले जाते. प्रथम वर्ष 2 लाख 28 हजार 372 रु. द्वितीय वर्ष 64 हजार 885 तर तृतीय वर्षात 64 हजार 885 अशी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होते.
या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
तुती लागवडीसाठी मनरेगा योजनेतून अनुदान योजना लाभ घेण्यासाठी मनरेगा कार्ड, आधार कार्ड, बॅंक पासबुक, फोटो, 7/12 व 8 अ आणि ग्रामसभेचा ठराव ही कागदपत्रे आवश्यक आहेत. यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी रेशीम कार्यालयात सुरू करण्यात आले आहे. तेथून या योजनेचा लाभ घेता येईल तसेच अधिक माहिती मिळू शकते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »