शाळा भरण्याची वेळ बदलणार; शिक्षणमंत्री काय म्हणाले वाचा
लोकगर्जनान्यूज
लोकांच्या सवयी बदलत असून याचा विचार केला असता शाळेची वेळा बदलण्याची चर्चा सुरू होती. अखेर शालेय शिक्षणमंत्र्यांनी विधिमंडळात याबाबत घोषणा करत इयत्ता २ पर्यंतची शाळा ९ च्या नंतर भरविण्यात येणार असल्याचे म्हटले तर इतर वर्गांसाठी समिती नेमण्यात येणार आहे.
आधी लोकांची लवकर झोपणे अन् लवकर उठणे अशी सवय असे, परंतु बदलत्या काळानुसार व सवयीमुळे लोकांची झोपण्याची व उठण्याची वेळ बदलली आहे. याचा लेकरांवरही परिणाम झाला. काही शाळा पहाटे भरत असल्याने त्यांची झोप पूर्ण होत नाही. याचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो म्हणून राज्यपालांनी शाळेच्या वेळेत बदलणं सूचना केल्याने राज्यातील शाळांची वेळ बदलणार याची चर्चा सुरू झाली. या सूचनेनुसार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी नागपूर येथे घोषणा करत अंगणवाडी ते इयत्ता २ पर्यंतची शाळा ९ नंतर भरविण्याचे आदेश दिले.याची अंमलबजावणी पुढील वर्षापासून म्हणजे जानेवारीपासून करण्यात येणार आहे. परंतु इतर तुकड्यांच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी समिती नेमण्यात आली. यामध्ये बालरोगतज्ञ, मनोवैज्ञानिक यांचा समावेश आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर इतर वर्गांबाबत निर्णय घेतला जाईल असे सांगितले आहे.