राजकारण

शहरातील सत्तर कोटींच्या विविध विकास कामांचा शुभारंभ: आमदार संदीप क्षीरसागरांची वचनपूर्ती

बीड : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत बीड शहरात विविध भागातील सिमेंट रस्ते व नाली बांधकामाच्या ७० कोटी रुपयांच्या विकास कामांचे आ.संदीप क्षीरसागर यांनी मंगळवार (दि.२०) उद्घाटन करून शहर वासियांना दिलेल्या वचनांची पूर्तता केली.

बीड विधानसभा मतदारसंघाचे तरुण तडफदार आमदार यांचा नेहमीच शहराचा विकास करण्याचा प्रयत्न असतो. यातूनच त्यांनी शहरवासीयांना शहरातील समस्या सोडविण्याचे वचन दिले आहे. याच्या पूर्ततेसाठी ते नेहमी प्रयत्नशील असल्याचे दिसून येते. याच वचनपूर्तीच्या दिशेने ते काम करत असून मंगळवारी ( दि. २० ) शहरातील अंबिका चौक ते अर्जुन नगर सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे,राजीव गांधी चौक ते व्यंकटेश स्कुल ( करपरा नदीपुल ) सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे, राधाकिसन नगर ते सरस्वती शाळा ते खोलवाट सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे, बार्शी रोड-दीप हॉस्पिटल ते रिपोर्टर भवन सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे, कासट-शहर पोलीस स्टेशन ते अश्विनी दवाखाना सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे, मसरत नगर-नेत्रधाम- स्वातंत्र्यवीर सावरकर चौक सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे,पेठ बीड पोलीस स्टेशन-इदगाह-नाळवंडी नाका ते पाण्याची टाकी सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे,बालाजी मंदिर ते काळा हनुमान ठाणा सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे ,बार्शी रोड-मुक्ता लॉन्स ते तकिया मस्जिद ते फ्रुट मार्केट ते खासबाग देवी रोड ( लेंडी नाका ) सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे,अंकुश नगर ते पाण्याची टाकी सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे, शितल वस्त्र भंडार मोंढा रोड परिसरातील दोन्ही बाजुचे रस्ते सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे अशी एकूण ७० कोटी रूपयांच्या विकास कामांचा आ.संदीप क्षीरसागर यांनी शुभारंभ केला. यावेळी माजी आ.सय्यद सलीम यांच्यासह राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक, राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, असंख्य कार्यकर्ते व स्थानिकांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »