शस्त्रधारी चोरट्यांचा धुमाकूळ… मारहाण करून सोन्याचांदीचे दागिने लुटले
नेकनूर : पोलीस ठाणे हद्दीमध्ये शस्त्रधारी चोरट्यांनी रात्री धुमाकूळ घालत सुलतानपुर येथे एकास आणि सफेपूर मध्ये दोघांना मारहाण करुन सोन्याचांदीचे लुटून नेले.तर, नेकनूर येथेही दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला.याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. या भागातील नागरिक दहशतीखाली असल्याचे दिसून येतं आहे.
बीड तालुक्यातील नेकनूर पासून जवळ असलेल्या सुलतानपूर येथील अशोक दगडु नाईकवाडे यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून गजाने मारहाण केली. यामध्ये त्यांच्या कानाला गंभीर दुखापत झाली. त्यांच्या जवळील सोन्याचे दागिने लुटून नेले. यानंतर चोरट्यांनी सफेपुर कडे मोर्चा वळवला येथील रामभाऊ किसन घोडके, गोरख रामभाऊ घोडके या दोघांना मारहाण करत त्यांच्या जवळील 7 ग्रॅम सोन्याचे दागिने जबरीने लुटून नेले. नेकनूर येथे ही माजी सरपंच शेख आझम पाशा, पांडुरंग होमकर यांच्या घरीही चोरीचा प्रयत्न केला. मात्र येथील नागरिकांना चोरटे आल्याचे समजल्याने ते जागे असल्याने चोरट्यांचा प्रयत्न फसला. येथील नागरिकांनी नेकनूूर पोलीसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली परंतु पोलीस पोहचण्या आधीच चोरटे पसार झाले. दरम्यान चोरट्यांनी दगडफेक करून दहशत निर्माण केली. असे सांगण्यात येते. एकाज रात्री दोन ठिकाणी चोरीची आणि नेकनूर येथे नागरिकांच्या सतर्कतेमुळे प्रयत्न फसल्याची घटना घडल्याने नेकनूर ठाणे हद्दीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.