व्हायरल ॲडिओक्लिपने बीड जिल्ह्यात खळबळ; पंकजा मुंडेना लोकसभेत कसा धोका दिला, धनंजय मुंडेंची गाडी फोडण्याची प्लॅनिंग
लोकगर्जनान्यूज
बीड : भाजपा युतीतील एका पक्षाच्या जिल्हा पदाधिकाऱ्याची एक ॲडिओक्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये त्याने लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना कसा धोका दिला यासह पालकमंत्री धनंजय मुंडे यांची गाडी फोडण्याची प्लॅनिंग कशी असून एक दगड ५० लाखाला विकत घेऊ असा धक्कादायक संवाद आहे. या क्लिप मुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
बीड लोकसभेची निवडणूक देशात गाजली असून, या अटीतटीच्या लढाईत भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा निसटता पराजय झाला आहे. या पराभावाचे कारणं सध्या शोधण्यात येत असताना. गुरुवारी (दि.२७) एक ॲडिओक्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिप मध्ये भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या एका पक्षाचा पदाधिकारी समोरील व्यक्तीला बोलताना पंकजा मुंडे यांना कसा धोका दिला. खासदार बजरंग सोनवणे यांना भेटून रात्रीतून कशी फिल्डिंग लावली आणि त्यांना पैसेही दिल्याचे सांगत आहे. तसेच पालकमंत्री धनंजय मुंडे यांची गाडीही फोडण्याची प्लॅनिंग असून, त्यासाठी दगड मारणाऱ्याला एका दगडासाठी ५० लाख देऊ असेही संभाषण आहे. तसेच तो पदाधिकारी पक्षांतराच्याही तयारीत असल्याचे दिसून येत आहे. पवार साहेब आणि जयंत पाटलांची सभा घेण्या पासून ते नियोजन सांगत आहे. यासाठी बप्पा आणि महेबुबला भेटून ठरवू अशीही चर्चा आहे. तसेच लोकसभेच्या पाच महिन्यांपूर्वीच बप्पांचे लोकसभेचे तिकीट फिक्स होते असाही दावा त्या कथित ॲडिओक्लिप मध्ये करण्या आलेला आहे. परंतु एकंदरीत यातून पुढाऱ्यांची विश्वासार्हतेवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.