आपला जिल्हा

व्हायरल व्हिडिओ! ऊस उत्पादक शेतकऱ्याचा कुटुंबासह रस्त्यावर ठिय्या

 

बीड जिल्ह्यात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न गंभीर बनला असून, कधी नव्हे ते ऊस उत्पादक शेतकरी यावर्षी अडचणीत आला. अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा ( खुर्द ) येथील शेतकऱ्याने तर यंत्रणेनेच मला रस्त्यावर आणल्याचे म्हणत कुटुंबासह रस्त्यावरच ठिय्या मांडला आहे. याचा व्हिडिओ ही सोशल मीडियावर आज सकाळपासून व्हायरल होतं आहे.

केज तालुक्यातील एका शेतकऱ्याने फडाला आग लावून आत्मदहनाचा इशारा दिला होता. यानंतर गेवराई तालुक्यातील एका शेतकऱ्याने ऊसाच्या फडाला आग लावून त्याच फडातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. वडवणी तालुक्यातील एका शेतकऱ्याने ऊसाच्या फडाला काडी लावून पुर्ण ऊस जाळून टाकलं हा प्रश्नच निकालात काढला. या घटना पहाता बीड जिल्ह्यातील अतिरिक्त ऊसाचा प्रश्न किती गंभीर आहे. हे लक्षात येतोय तर, आज सकाळपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होतं असून, तोही अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा ( खुर्द ) येथील रविंद्र विक्रम ढगे यांचा असून, यातील संभाषण ऐकलं तर ते किती व्याकूळ आहेत. तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या ते इतक्या पोटतिडकीने मांडत आहेत हे लक्षात येते. यंत्रणा व कारखानदारांना शेतकऱ्यांच काही एक देणं घेणं नाही. रविंद्र ढगे हे म्हणतात की, २०१९ मध्ये प्रथम ऊस लागवड केली. तेव्हा परिसरात ७० एक्कर ऊस लागवड होती. तेव्हा नॅचरल शुगरने सभासद नसताना आदरपूर्वक ऊस नेहला यावर्षी अतिरिक्त ऊस झाल्याने १९ महिने झाले शेतातच ऊस उभं आहे. यासाठी १ लाख १० हजार खर्च झाला. २० तारखे पासून अप्पर जिल्हाधिकारी, तहसीलदार, तलाठी यांच्याकडे पाठपुरावा करतोय. सरपंच समोर पंचनामा करुन विना खर्च व शर्त ऊस घेऊन जाण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्याप ऊस शेतात उभा आहे. इतकीच शेती असून त्यावर कुटुंबाची उपजीविका आहे. ऊस गेला नाही मग कुटुंबाने कसं जगायचं? हे आंदोलन नाही तर माझं यंत्रणेने रस्त्यावर आणलेलं घर असून त्यात मी रहातोय, असे म्हणत अभिनंदन रस्त्यावर घरं आणणाऱ्यांच आणि सन २०२० मध्ये मागे लागून ऊस नहणाऱ्या ठोंबरे साहेबांच असा उपरोधिक टोला लगावला. हार्वेस्टरसाठी इकडून तिकडून ५ हजार जमा केले. तो आता म्हणतोय परवडत नाही? तुमचा ऊस मशीनने जात नाही? मग १५ हजार दिले की, ऊस कसा जातो? असा प्रश्न उपस्थित केला. उपजिल्हाधिकारी, तहसिलदार यांचे ऊस घेऊन जाण्याचे आदेश आहेत. परंतु कारखाना ऊस नेत नाही, यंत्रणा चिरीमिरी दिल्याशिवाय तोडणी करत नाही. मग शेतकऱ्यांनी काय कराव? कारखानदार आणि यंत्रणेने मला रस्त्यावर आणलेलं असून, मी येथेच रस्त्यावर राहाणार, पन्नास रुपये पडले तर आपण शोधतो मी तर १ लाख १० हजार लेकरांबाळांच्या तोंडातून काढून उसासाठी खर्ची केले. १९ महिने उलटले तरी तो शेतातच उभा आहे. माझं कुटुंब रस्त्यावर आणलेलं असल्याने आता मी, माझं कुटुंब रस्त्यावर रहाणार असल्याचे शेतकरी मोठ्या पोटतिडकीने बोलताना व्हिडिओत दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »