आपला जिल्हा

व्यसनमुक्ती केंद्रांवर छापे; बोगसगिरी उघड होणार?

लोकगर्जनान्यूज

बीड : जिल्ह्यातील व्यसमुक्ती केंद्राच्या नावाखाली रुग्णांची फसवेगिरी सुरू आहे. याबाबत अनेक दिवसांपासून कुणकुण सुरू होती. परंतु तक्रार करण्यासाठी कोणी पुढे येत नव्हते. अंबाजोगाई तालुक्यातील प्रकार चव्हाट्यावर आला आणि याला तोंड फुटले. याची दखल घेऊन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी बीड, अंबाजोगाई,केज येथील नवजीवन व्यसनमुक्ती केंद्रांवर छापे मारले आहेत. यातून मोठी बोगसगिरी उघड होणार? अशी जोरदार चर्चा जिल्हाभर सुरू आहे.

व्यसनाधीनता मुळे बेजार असलेले कुटुंब व्यसन सुटावा म्हणून मोठ्या अपेक्षेने व्यसनमुक्ती केंद्रात येत असे. याचाच फायदा उचलत ही केंद्र केवळ त्यांना लुटण्याचा धंदा करत होते का? असे आजच्या कारवाईतून दिसून येत आहे. याबाबत कोणीही तक्रार करण्यासाठी पुढे येत नसल्याने यांचे फावत होते. परंतु अंबाजोगाई येथील व्यसनमुक्ती केंद्रात डॉक्टर असलेल्या महिलेने अनेक धक्कादायक खुलासे केल्याने याप्रकरणी तक्रार केल्याने अंबाजोगाई येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची दखल घेत आज जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे व पोलीस प्रशासनाने बीड शहरातील नवजीवन व्यसनमुक्ती केंद्र तसेच केज, अंबाजोगाई तालुक्यातील वाघाळा, मोरेवाडी येथील व्यसनमुक्ती केंद्राची झडती घेतली. यामध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या असल्याचे बोलले जात आहे. तसेच बीड येथील केंद्रामध्ये मागील ४ ते ५ दिवसांपासून डॉक्टर फिरकले नसल्याचे समोर आले. एक्सपायर झालेली औषधे सापडली आहेत. येथील रुग्णांची सुटका ही करण्यात आली आहे. याबाबत प्रशासनाकडून खुलासा करण्यात आल्यानंतर चित्र स्पष्ट होईल. या कारवाईचे जिल्हाभरात कौतुक करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »