वैद्यनाथ अर्बनचे नवीन जागेत थाटात शुभारंभ
लोकगर्जनान्यूज
आडस : येथील वैद्यनाथ अर्बन मल्टीपल निधी लि. चे नवीन जागेत आज मंगळवारी ( दि. १५ ) सकाळी भाजपा नेते रमेश आडसकर यांच्या शुभहस्ते थाटात शुभारंभ झाला.
येथील वैद्यनाथ अर्बन मल्टीपल निधी लि. आडस च्या मुख्य शाखेचे आसरडोह रोडवरुन धारूर रोडवरील बाजार समितीच्या कॉम्प्लेक्स मध्ये आज स्थलांतर झाले. यानिमित्ताने शुभारंभ व चहा,पानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी भाजपा नेते रमेश आडसकर यांच्या हस्ते फित कापून व श्रीफळ फोडून शुभारंभ करण्यात आला. यावेळी ह.भ.प. नंदिनी ताई सानप, युवा नेते ऋषिकेश आडसकर, मा.जि.प. सदस्य भागवत नेटके, सरपंच बालासाहेब ढोले, उपसरपंच ओमकार आकुसकर, चेअरमन उद्धवराव इंगोले, उद्योजक विठ्ठल माने, बाळासाहेब देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सामाजिक कार्यकर्ते शिवरुद्र आकुसकर यांनी मानले. यावेळी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत ॲड. पुरुषोत्तम तागड, विठ्ठल तागड, अनिल काशिद, शिवाजीराव गायके, रमेश गायके, रवी ढवळे यांनी केले. तसेच यावेळी आडस व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.