क्राईम
वृध्द महिलेचा दगडाने ठेचून खून? केज तालुक्यातील घटना
केज : तालुक्यातील एका गावात ६० वर्षीय वृध्द महिलेचा दगडाने ठेचून खून? केल्याची घटना समोर आली. या घटनेने तालुक्यात खळबळ माजली आहे. एएसपी पंकज कुमावत यांनी घटनास्थळी भेट दिली.
मयत वृध्द महिला केज तालुक्यातील नांदूरघाट येथील पारधी समाजातील असल्याचे सांगितले जात आहे. हा खून कोणी केला? कारण काय? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच एएसपी पंकज कुमावत यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलीस तपास करत असून लवकरच याची उकल होईल असे सांगितले जात आहे.