कृषी
वीजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू
केज : तालुक्यातील मस्साजोग येथील तरुणास वीजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना सांगवी (सारणी) शिवारात घडली.
हनुमंत ज्ञानोबा देशमुख (वय ३६ वर्ष ) रा. मस्साजोग असे मयताचे नाव आहे. आज रविवार दुपारी १ वाजण्याच्या सुमारास सांगवी (सारणी) शिवारात वीजेचा धक्का लागून मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे प्रक्रिया संहिता १७४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील पुढील तपास करीत आहेत.