वीजेचा खेळखंडोबा : तेलगाव १३२ केंद्राराच्या आशिर्वादाने आडस बुडाले अंधारात!
लोकगर्जनान्यूज
केज : तालुक्यातील आडस येथे जवळपास महिनाभरापासून वीजेचा लंपडाव सुरू झाला. कधी आडस ३३/११ के व्हीचे बिघाड तर अनेकवेळा तेलगाव १३२ केंद्रातून तासनतास ब्रेक डाऊन यामुळे आडस सह परिसर अंधारात बुडाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. महावितरण कंपनी नियमाप्रमाणे प्रत्येक ताशी ५० दंड म्हणून ग्राहकांना द्यावी लागणारी रक्कम वीजबिलातून कमी करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.
आडस येथे मागील काही दिवसांपासून वीजेचा खेळखंडोबा झाला आहे. ती कधी येईल अन् कधी जाईल याचा काहीच ताळमेळ नाही. वीजपुरवठा सुरू असला तरी तो योग्य दाबाने नाही. यामुळे शेतकऱ्यांचे पाण्याचे पंप सोडा घरातील पंखाही फिरत नाही. अशी अवस्था असतानाही लोड येत असल्याचं कारण सांगून तासनतास वीजपुरवठा बंद केला जात आहे. तसेच आडस येथील ३३/११ के व्ही केंद्राला तेलगाव येथील १३२ केंद्रावरुन वीजपुरवठा केला जातो. तेलगाव येथूनही नेहमीच वीजपुरवठा बंद केला जात आहे. ते कधी येईल याचेही उत्तर मिळत नाही. रविवारी ( दि. ११ ) मध्य रात्री १:३० वाजता वीजपुरवठा बंद झाला होता तो सकाळी ९ वाजता सुरू झाली. सोमवारी ( दि. १२ ) सायंकाळी ६ वाजता बंद झालेला वीजपुरवठा दुसऱ्यादिवशी मंगळवारी ( दि. १३ ) ११ वाजता सुरू झाला. हे कमी होत की, काय? तर बुधवारी ( दि. १४ ) पहाटे ४ वाजता बंद झालेला वीजपुरवठा दुपारी २ वाजण्याच्या सुमारास सुरू झाला. यानंतर ५ वाजेपर्यंत नियमित अर्धा तास ही चालला नाही. लंपनडाव सुरुच होता. कारण विचारले की, तेलगाव येथून ब्रेक डाऊन आहे. कधी आडस ते धारुरच्या मध्ये तर कधी धारुर ते तेलगाव दरम्यान लाईन बिघाड ( फॉल्ट ) असल्याचे उत्तर मिळतात. १५ तास, ८ ,१० तास दररोज वीजपुरवठा बंद रहात असल्याने आडससह परिसरातील गावे अंधारात बुडाली असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
*महावितरण कंपनी वीज ग्राहकांना दंड भरपाई करणार का?
वीजबिल आले अन् ते भरण्यास एक दिवस उशीर झाला तर कंपनी १० रु. दंड घेते. अन् एक महिना झाला तर त्याला व्याज व दंडाची रक्कम भरुन घेते. तसा नियमही आहे. मग जर ठोस कारण नसताना वीजपुरवठा बंद राहिला तर ग्राहकांना प्रती तास ५० रु. दंड भरपाई म्हणून महावितरण कंपनीने द्यावे असा नियम आहे. मग आडस व परिसरात जुजबी कारणं पुढे करुन सुरू असलेला वीजेचा लंपडाव व यामुळे बंद असलेला वीजपुरवठा याची नुकसान भरपाई म्हणून प्रति तास ५० रु. प्रमाणे महावितरण कंपनी वीजबिलात रक्कम कमी करेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
*वीजपुरवठा बंद फोन बंद
वीजपुरवठा तर सतत बंद रहात आहेच पण सोबत येथील ३३/११ के.व्ही येथील ऑपरेटर यांना ग्राहकांच्या सोयीसाठी दिलेला फोन नंबर बंद असतो. ही पध्दत मागील दोन दिवसांपासून सुरू झाली आहे. काही लाईनमनचेही नंबर बंद असतात. फक्त एकमेव येथील कनिष्ठ अभियंता यांचा नंबर सुरू आसतो.