विवाहितेचा छळ; नवरा, सासूसह सासरकडील आदींवर गुन्हा दाखल

केज : विवाहितेचा तिच्या सासरच्या लोकांनी मानसिक व शारीरिक छळ केल्या प्रकरणी नवरा, सासू, दीर यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साळेगाव येथील रोहिणी हिचे ६ डिसेंबर २०१९ रोजी बीड येथील महेश लामतुरे यांच्या सोबत लग्न झाले . लग्ना नंतर तिला सुरुवातीचे काही दिवस चांगले सांभाळले. त्या नंतर पती महेश बाळकृष्ण लामतुरे हा दारु पिऊन येवुन मारहाण करीत असे. तसेच माहेरहून सोने व पैसे घेवुन ये; म्हणुन पैशाची मागणी करीत होता. तसेच सासु, सासरे, दीर यांच्यासह इतरांनी तिला शारिरीक व मानसिक त्रास देऊन उपाशीपोटी ठेवून घरा बाहेर काढले.
या बाबत मध्यस्थानी समजूत काढूनही फायदा झाला नाही. त्या नंतर तिने १७ मार्च २०२१ रोजी केज येथील कौटुंबिक हिंसाचार व समुपदेशन केंद्र येथे तक्रार दिली. मात्र त्या नंतरही सासरच्या लोकांनी समेट किंवा तडजोड केली नाही व तिला नांदवण्यास नेले नाही.
त्यामुळे महिला समुपदेशन केंद्राच्या पत्रा वरून दि. २५ डिसेंबर २०२१ रोजी केज पोलीस ठाण्यात रोहिणी लामतुरे हिच्या फिर्यादी वरून तिचा पती महेश बाळकृष्ण लामतुरे, सासू लताबाई बाळकृष्ण लामतुरे, नणंद अंजली बाळकृष्ण लामतुरे व राणी बाळकृष्ण लामतुरे, दीर गणेश बाळकृष्ण लामतुरे, जाऊ प्रिती गणेश लामतुरे व सासूचे वडील जगन्नाथ नारायण साखरे सर्व रा. जुने बीड हिरालाल चौक साळगल्ली या सात जणांच्या विरुद्ध गु.र.नं. ५९४/२०२१ भा.दं.वि. ४९८(अ), ३२३, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस नाईक रुक्मिणी पाचपिंडे या करीत आहेत.