विद्यापीठाच्या महिला हॉलीबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी प्रा.डॉ.प्रविण शिलेदार
गेवराई : जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या गेवराई येथील महिला महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रविण शिलेदार यांची विद्यापीठाच्या महिला हॉलीबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे संचालक डॉ. बडवणे यांनी दि.१३ डिसेंबर रोजी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे प्रा.डॉ.प्रविण शिलेदार यांची विद्यापीठाच्या महिला हॉलीबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी ही नियुक्ती करण्यात आली आहे.
पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाने आयोजित केलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा महिला हॉलीबॉल संघ सहभागी झाला असून या संघाचे प्रशिक्षक म्हणून प्रा. डॉ. प्रविण शिलेदार संघासोबत रवाना झाले आहेत.
अ. भा. आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेसाठी विद्यापीठाच्या महिला हॉलीबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्याबद्दल मा. राज्यमंत्री मा. श्री. शिवाजीरावदादा पंडित, जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. अमरसिंह पंडित, सचिव मा. श्री. जयसिंग पंडित, युवानेते मा. श्री. विजयसिंह पंडित, महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. कांचन परळीकर, प्रशासकीय अधिकारी श्री. प्रमोद गोरकर, महाविद्यालयाचे प्राध्यापक- कर्मचारी आदींनी प्रा. डॉ. प्रविण शिलेदार यांचे अभिनंदन केले असून शुभेच्छा दिल्या आहेत.
डॉ.बा.आं.म. विद्यापीठाच्या ज्या महिला हॉलीबॉल संघाचे प्रशिक्षक म्हणून प्रा. डॉ. प्रविण शिलेदार यांची नियुक्ती झाली आहे त्या संघात रेवती सुतार, साक्षी राठोड, अदिती बागुल, अनुपमा दराडे, प्राची देवकर, निकिता चव्हाण, अश्विनी गायकवाड, अश्विनी सरवदे, अंबिका राजपुतपरदेशी, नंदिनी बनकर, दिक्षा भोले, आणि आकांक्षा चंदेले या महिला खेळाडूंचा समावेश असून सदर स्पर्धेत या संघाची कामगिरी चमकदार ठरत आहे.