महिला विश्व
विडा येथील गोपिका पतसंस्थेच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न
केज : तालुक्यतील विडा येथे रविवारी ( दि. २३ ) गोपिका महिला बिगरशेती पतसंस्थेच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला. राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेच पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी डॉ. शीला कांबळे वैद्यकीय अधिकारी विडा, पतसंस्थेच्या अध्यक्षा प्रतिभा देशमुख, सचिव रोहिणी पटाईत, सदस्य अनिता पवार,सुनीता गायकवाड, अश्विनी पवार, हिराबाई शेळके,निकिता छाजेड,किसनबाई पवार,उर्मिला नन्नवरे सह आदि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.