विज्ञान प्रदर्शनातून वैज्ञानिक तयार करण्याची दिशा:सुरेश यादव
धारूर : तालुक्यातील महात्मा फुले आश्रम शाळा कोळपिंपरी येथील लोकसंसद विद्यार्थी सभागृहात निसर्गरम्य वातावरणात संपन्न झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये प्राथमिक गटात ७२ व माध्यमिक गटातून १५ तर शिक्षक गटातून तीन प्रयोगाचे सादरीकरण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे संयोजक स्वागत उत्सुक सुरेश यादव प्रदेशाध्यक्ष एमपीसीसी विज्ञान तंत्रज्ञान व कौशल विकास विभाग तथा अध्यक्ष महात्मा फुले आश्रम शाळा यांनी उत्कृष्टपणे कार्यक्रमाचे आयोजन केले. ग्रामीण भागात प्रथम भरलेल्या विज्ञान प्रदर्शनास पाहण्यासाठी मोठा प्रतिसाद मिळाला असून प्रदर्शन पाहण्यासाठी पालक, विद्यार्थी, विज्ञानप्रेमी, युवक,महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमास प्रथम दिवशी गटशिक्षणाधिकारी गणेश गिरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शहाजी लोमटे, केंद्रप्रमुख जिजाभाऊ नेटके, विलास मुळे, तर समारोप व बक्षीस वितरण प्रसंगी धारूर पोलीस स्टेशनचे सपोनि विजय अटोळे,पत्रकार अनिल महाजन, गटशिक्षणाधिकारी गणेश गिरी, पत्रकार नाथा ढगे, केंद्रप्रमुख गडदे, सीडीओ कदम, सरपंच विजयकुमार खुळे, विजय करपे, शेख असोफोदिन, अंगद फुटाणे, काशिनाथ नागरगोजे, रामदास साबळे आदी मान्यवरांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रस्ताविकेमध्ये सुरेश यादव यांनी बोलताना अंधश्रद्धा दूर व्हावी व तालुक्यातून एखादा वैज्ञानिक तयार व्हावा, त्याने भारत देशाचे नेतृत्व करावे अशी संकल्पना मांडली विज्ञान प्रदर्शन घेण्यामागचा सर्वात मूळ उद्देश म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा ही असून या पुढील काळातही अशीच विज्ञान यात्रा प्रदर्शने भरवले जातील असे यादव यांनी म्हटले.
प्राथमिक गटातून तेलगाव येथील जिजामाता प्राथमिक विद्यालयाचे प्रथम क्रमांक,द्वितीय क्रमांक धारूर येथील जिल्हा परिषद कन्या शाळेने मिळवला तर तृतीय क्रमांक गांजपुर जीवन शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघोली यांनी तृतीय क्रमांक, जिल्हा परिषद कन्या शाळा धारूर माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक हुतात्मा पापासिंग माध्यमिक विद्यालय, द्वितीय क्रमांक कारी येथील न्यू हायस्कूल, तृतीय क्रमांक जनता माध्यमिक विद्यालय धारूर यांनी तर शिक्षक गटातून प्राथमिक विभागातून नूतन माध्यमिक विद्यालयाचे अशोक नागेश तर माध्यमिक गटातून सरस्वती माध्यमिक विद्यालयाचे प्रसाद कुलकर्णी यांनी मिळवला प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक आलेल्या प्रयोगांना जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये सादरीकरण करण्याची संधी मिळाली आहे सर्व क्रमांक मिळवलेल्या बाल वैज्ञानिकांना प्रमाणपत्र शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रम समन्वयक म्हणून शेख एस.एस सर यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचलन प्रा.अंजली चिंचोलकर, रमेश सूर्यवंशी यांनी केले