विचित्र अपघात; तब्बल सहा वाहने एकदुसऱ्यावर आदळली
लोकगर्जनान्यूज
केज : शहरात मुख्य रस्त्यावर दीड तासांपूर्वी सहा वाहने एक दुसऱ्यांवर आदळून विचित्र अपघात झाला. यामध्ये वाहनांचे मोठं नुकसान झालं असून मोठी दुर्घटना टळल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. यामुळे रस्त्यावर मोठी गर्दी जमल्याने वाहतूक ठप्प झाली.
केज-मांजरसुंबा रस्त्यावर केज शहरातील अनील भोजनालय समोर टँकर,छोटा हात्ती, रुग्णवाहिका, स्कॉर्पिओ, कार व दुचाकी या सहा वाहनांचा विचित्र अपघात आज शुक्रवारी ( दि. ३० ) ४:३० वाजण्याच्या सुमारास घडला आहे. यामध्ये वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु सुदैवाने कोणाला गंभीर इजा अथवा जिवीतहानी न झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. वाहनांच्या आवाजाने काय घडलं? म्हणून आजुबाजुच्या लोकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली असून, रस्त्यावर बघ्यांची मोठी गर्दी जमली आहे. यामुळे केज-मांजरसुंबा रस्त्यावर वाहतूक ठप्प झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या अपघातात दोघे किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हा अपघात नेमका कसा घडला? याबाबत अधिकृत माहिती मिळाली नाही. पण छोटा हत्ती आनील भोजणालय समोर वळण घेत असताना मांजरसुंबा कडून येत असलेल्या भरधाव टँकरने या छोट्या हत्तीला धडक दिली. धडक बसून सदरील ठिकाणी उभ्या असलेल्या चार वाहनांवर ही वाहने आदळली असल्याची चर्चा आहे.
सकाळीच एक ट्रक रस्त्याच्या खाली उतरला
आज सकाळीच माल वाहतूक करणारा ट्रक काहीतरी बिघाड झाल्याने व ब्रेक लागत नसल्याने ट्रक चालकाने प्रसंगावधान राखून तहसील कार्यालयासमोर ट्रक रस्त्याच्या खाली घातला व तो एका खड्ड्यात जाऊन थांबला.