वाइन बाबतीत शरद पवार यांचे सूचक वक्तव्य; ठाकरे सरकार निर्णय मागे घेणार का?
राज्य सरकारने मागील आठवड्यात सुपर मार्केट व ‘वॉक इन स्टोअर’ मध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा विरोधकांकडून कडाडून विरोध केला जात आहे. महाविकास आघाडी सरकारचे मार्गदर्शक शरद पवार यांनी वाइन हा चिंतेचा विषय वाटत नाही पण कोणाला तसे वाटत असेलतर सरकारने वेगळा दृष्टिकोनचा विचार केला तर, वावगं ठरणार नाही. असे सूचक वक्तव्य केले. त्यामुळे ठाकरे सरकार हा निर्णय मागे घेणार का? अशी चर्चा रंगली आहे.
राज्यातील द्राक्ष बागायतदार तसंच वाइन उद्योगास चालना देण्यासाठी सुपर मार्केट व ‘वॉक इन स्टोअर’मध्ये वाइन विक्रीस परवानगी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यामध्ये शैक्षणिक आणि धार्मिक स्थळांच्या जवळ वाइन विक्रीला परवानगी नाही असेही ठरले आहे. या निर्णयाला होत असलेल्या विरोध पहाता महाविकास आघाडी सरकारचे मार्गदर्शक, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना प्रसारमाध्यमांकडून विचारण्यात आलं असता ते म्हणालेत की, वाइन आणि इतर मद्यांमधील फरक समजून घेतले पाहिजे. तो घेतला नाही. या निर्णयाला विरोध असेल तर, सरकारने या संदर्भात वेगळा विचार करावा. हा चिंताजनक विषय आहे असं वाटत नाही. पण काहीजणांना वाटत असेल तर त्यासंबंधी राज्य सरकारने वेगळा दृष्टीकोन स्विकारला तर फारसं वावगं ठरणार नाही. असे सूचक वक्तव्य केले. यामुळे राज्यातील ठाकरे सरकार हा निर्णय मागे घेणार का? असा प्रश्न उपस्थित करत चर्चा केली जात आहे. वाइन विक्रीला सुपर मार्केट मध्ये परवानगी देण्याच्या निर्णयाला विरोधी पक्षाचा कडाडून विरोध असून यावर मा.मुख्यमंत्री विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सह भाजपाच्या नेत्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.