वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून पदोन्नती मिळाल्याने तांबवे यांचा सत्कार
आडस : महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे धारूर तालुका अध्यक्ष संदीप तांबवे यांची वरिष्ठ तंत्रज्ञ पदी पदोन्नती झाल्यामुळे सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
आडस येथील महावितरण कंपनी कनिष्ठ अभियंता कार्यालय अंतर्गत संदीप तांबवे हेल्पर म्हणून कार्यरत होते. त्यांना वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून पदोन्नती मिळाली आहे. त्यामुळे महावितरण कर्मचारी संघटनेचेच्या वतीने जिल्हाध्यक्ष कल्याण मस्के, अंबाजोगाई विभागाचे उपाध्यक्ष दयानंद कावळे, धारुर तालुक्याचे उपाध्यक्ष सतेज सोनवणे, सचिव दीपक गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच आडसवासीयांच्या वतीने युवक नेते ऋषिकेश आडसकर (उपसभापती पंचायत समिती केज), भागवत नेटके (जिल्हा परिषद सदस्य आडस ), शिवरुद्र आकुसकर यांच्यावतीने संदीप तांबवे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन सुदर्शन काळे यांनी केले होते.