वज्रमूठ आवळा अन् २०२४ च्या तयारीला लागा – पंकजा मुंडे
लोकगर्जना न्यूज
बीड : मी नाराज नाही व कोणतेही पद मागणार नाही. असे म्हणत पंकजा मुंडे यांनी सावरगाव दसरा मेळाव्यातून समर्थकांना २०२४ च्या तयारीला लागा असे आवाहन केले. तसेच जरुरत से ज्यादा इमानदार हुं मैं इस लिये सबके नजरों में गुन्हेगार हुं मैं अशा शेरोशायरीच्या माध्यमातून मन मोकळं केलं.
सावरगाव येथे दसरा निमित्ताने पंकजा मुंडे यांनी मेळावा आयोजित केला. काही दिवसांपूर्वीच त्यांच मोदीही मला संपवू शकत नाही. हे विधान गाजले होते. यामुळे पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात काय बोलणार? याकडे राज्याच्या नजरा लागल्या होत्या. परंतु पंकजा यांनी मी यापुढे पक्षाला त्रास देणार नाही. पदर पसरून कोणालाही काही मागणार नाही. पदाची अपेक्षा सोडून पक्षाने उमेदवारी दिली तर मी परळीतून निवडणूक लढवणार आहे. २०२४ च्या तयारीला मी लागले असून, तुम्ही तयारीला लागा असे आवाहन केले. मुंडे नावाला बट्टा लागेल असे काम करणार नाही. मी उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही. या मेळाव्यातून नाराजीच्या चर्चांना एक प्रकारे पूर्णविराम दिला. मी तुम्हाला स्वाभिमान दिला असून स्वाभिमानी रहा. मी वाडी-वस्ती पर्यंत पोचले नाही का? विकास तुमच्या पर्यंत पोचला नाही का?मी मंत्री असताना चांगले काम केले नाही का? असे प्रश्न उपस्थित करत. वज्रमूठ आवळा आणि २०२४ च्या तयारीला लागा असे आवाहन केले. यावेळी जिल्ह्यातील अनेक नेत्यांची उपस्थिती होती. तसेच मोठ्या प्रमाणात मेळाव्यासाठी जनसागर लोटला होता.