लाच स्वीकारताना पोलीस कर्मचारी चतुर्भुज; आडस पोलीस चौकीत रक्कम स्विकारताना पकडले!
लोकगर्जना न्यूज
एका गुन्ह्यात आरोपीला मदत करण्यासाठी आडस ( ता. केज ) चौकीतील पोलीस कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केली. ठरलेली १० हजार रु. स्विकारताना बीड एसीबी पथकाने पोलीस चौकीत रंगेहाथ पकडल्याची घटना मंगळवारी ( दि. २२ ) घडली आहे.
धारुर पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या आडस पोलीस चौकी हद्दीतील दाखल गुन्ह्यातील आरोपीला मदत करण्यासाठी चौकीतील कार्यरत कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केली. तडजोड करुन १० हजार रुपये देण्याचे ठरले. सदरील व्यक्तीची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने बीड एसीबी कडे तक्रार केली. त्यावरून बीड एसीबीने आडस येथे सापळा लावला पोलीस चौकी मध्ये १० हजार रुपये स्विकारताना पोलीस कर्मचाऱ्यास रंगेहाथ पकडले. तेजस ओव्हाळ असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी धारुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेने आडस परिसरात खळबळ उडाली आहे.