लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात: खाजगी इसमाच्या माध्यमातून स्विकारले सात हजार
लोकगर्जना न्यूज
अंबाजोगाई : प्लॉटची फेरफार नोंद करण्यासाठी ७ हजारांची लाच खाजगी इस्माच्या हस्ते स्विकारताना बीड एसीबीने रंगेहाथ पकडले. सदरील कारवाई अंबाजोगाई येथे शितल बिअर बार समोर केली. या प्रकरणी तलाठी व खाजगी इसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रफुल्ल सुहासराव आरबाड ( वय ३० वर्ष ) तलाठी सज्जा, अंबाजोगाई रा.प्रशांत नगर अंबाजोगाई, खाजगी इसम नजीरखान उमरद राजखान पठाण ( वय ४३ वर्ष ) रा. फ्लॉवर्स कॉर्टर, अंबाजोगाई असे लाच प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तक्रार दाराने खरेदी केलेल्या प्लॉटची फेरफार नोंद घेण्यासाठी अंबाजोगाई सज्जाचे तलाठी प्रफुल्ल आरबाड यांच्याकडे रितसर अर्ज केला. यामध्ये टॅक्स पावती न देता ७/१२ नोंदणीसाठी तलाठ्याने १० हजाराची लाच मागितली. याप्रकरणी संबधिताने बीड एसीबीकडे तक्रार केली. त्यावरून एसीबीने ( दि. २३ ) पडताळणी केली. यामध्ये लाच मागितली असल्याचे निष्पन्न झाले. आज सोमवारी ( दि. २६ ) सापळा लावण्यात आला. यावेळी तलाठी आरबाड आणि खाजगी इसम पठाण हे दुचाकीवर आले. तक्रार दाराला मागे चलण्यास सांगितले व शितल बिअर बारच्या समोर तलाठी आरबाड यांनी लाचेची रक्कम नजीरखान पठाण कडे देण्यास सांगितले. यावेळी पंच समक्ष एसीबीने त्यास लाच घेताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी तलाठी प्रफुल्ल सुहासराव आरबाड व नजीरखान राजखान पठाण या दोघांवर अंबाजोगाई येथे गुन्हा दाखल करण्यात आला. सदरील कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी अमोल धस, कर्मचारी अविनाश गवळी,भरत गारदे, संतोष राठोड, गणेश म्हेत्रे यांनी केली. तसेच कोणी लाच मागितली तर एसीबीके तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले.