आपला जिल्हा
लाचखोर एसीबीच्या जाळ्यात
बीड : गेवराई येथे भूमापक व एका खाजगी व्यक्तीला एक हजाराची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ पकडले आहे. आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
अतिक्रमण रहित नकाशा देण्यासाठी गेवराई भूमिअभिलेख कार्यालयातील भूमापकाने तक्रारदारांकडे लाचेची मागणी केली.यापूर्वीच त्याने ३ हजार ५०० रु. घेतले असून आज १ हजार रुपये देण्याचे ठरले होते. संबंधित व्यक्तीने याची बीड एसीबीकडे तक्रार केली. त्यावरून सापळा रचून भूमापक असदखान पठाण व मयूर कांबळे या खाजगी व्यक्तीस १ हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई बीड एसीबीचे उपाधीक्षक भारत राऊत यांच्या पथकाने केली.