शिक्षण संस्कृती
रोहिणी कांबळे नेट उत्तीर्ण झाल्याने अभिनंदनाचा वर्षाव
लोकगर्जनान्यूज
आडस : केज तालुक्यातील आडस येथील रोहिणी प्रकाश कांबळे यांनी नेट परिक्षेत उल्लेखनीय यश संपादित केले असून, १३२ वी रॅंक घेतली आहे. या यशा बदल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आडस येथील रहिवासी व सध्या अंबाजोगाई येथील योगेश्वरी महाविद्यालयात, तासिका तत्त्वावर ज्ञानदान करत आहेत. नेट परिक्षेचा नुकताच १७ नोव्हेंबर रोजी निकाल घोषीत झाला. यामध्ये रोहिणी कांबळे यांनी १३२ रँक घेऊन यश संपादन केले. या यशाचे श्रेय त्यांनी आई-वडील व गुरुजींना दिल. तसेच याबद्दल रोहिणी कांबळे यांचे नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रपरिवार, सहकाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.