रोगनिदान व उपचार शिबिराचा घेतला शेकडो रुग्णांनी लाभ
केज तालुक्यातील आडस येथे रविवारी ( दि. ३१ ) रोगनिदान व उपचार शिबिर पार पडले याचा परिसरातील रुग्णांनी लाभ घेतला.
येथील सर्वोदय सेवा प्रतिष्ठानच्या वतीने ८ व्या वर्धापनदिनानिमित्त मोफत महा रोगनिदान व उपचार शिबिर प्राथमिक आरोग्य केंद्रात पार पडलं. शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांच्या हस्ते करण्यात आले. छाती विकार, अस्थिरोग ( हडांचे ), बालरोग, स्त्री रोग, ह्रदय, मधुमेह, रक्तदाब, दंत रोग, नेत्र रोग यांची तपासणी, निदान व उपचार करण्यात आले. यावेळी डॉ. अनिल मस्के, डॉ. नामदेव जुने पाटील, डॉ. जुबेर शेख, डॉ.अविनाश मुंडे, डॉ. प्रगती मुंडे, डॉ. लक्ष्मीकांत पांचाळ, डॉ. कृष्णा केकाण, डॉ. आनंदसिंह पवार या तज्ञ डॉक्टरांनी निदान व उपचार केले. शिबिराचा आडससह परिसरातील शेकडो रुग्णांनी लाभ घेतला. सर्व रुग्णांना मोफत औषधं, गोळ्याही देण्यात आल्या आहेत.या शिबिरा मुळे अनेक गोरगरिबांना मोठा आधार मिळाला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. शिबिर यशस्वी करण्यासाठी सचिनसिंह पवार, सागरसिंह पवार, सुजितसिंह पवार, अकाशसिंह पवार,जगदीशसिंह पवार, गजानन तोडकर, काशिनाथ तोडकर, राज तोडकर, संतोष लाखे, किरण लाखे, ओमकार आकुसकर, सागर काळे, किशोर पत्रवाळे, सुशिल काळे, विश्वजीत शिलेदार, शिवरूद्र आकुसकर, सुषमा आकुसकर, सविता आकुसकर, रामदास साबळे, नितीनकुमार ठाकुर यांनी परिश्रम घेतले.