रेशीम शेतकऱ्यांचे पेमेंट सात दिवसाचा जाचक नियम: बीडचे खरेदी केंद्र शेतकरी हिताचे की, व्यापारी?
लोकगर्जनान्यूज
बीड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने रेशीम उत्पादक शेतकऱ्यांची सोय व्हावी म्हणून कोष खरेदी केंद्र सुरू केले. परंतु माल खरेदी केल्यानंतर पेमेंट सात दिवसांत देण्याचा जाचक नियम लावलं. खरेदी करणारे व्यापारी रोख रक्कम भरुन खरेदी करत असतील तर शेतकऱ्यांसाठी सात दिवसांचा नियम का? अन् उधार खरेदी करत असतील तर हे खरेदी केंद्र शेतकऱ्यांच्या हितासाठी चालू केला की, व्यापाऱ्यांच्या असा प्रश्न रेशीम उत्पादक शेतकरी विचारत आहेत.
बीड जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने रेशीम शेती करतात. या शेतकऱ्यांना कोष विक्रीसाठी रामनगर ( कर्नाटक ) अथवा जालना येथे जावं लागतं असे. यामुळे वाहतूक खर्च मोठ्या प्रमाणात येत असे, ही अडचण ओळखून मा.मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या संकल्पनेतून बीड कृषी उत्पन्न बाजार समितीने रेशीम कोष खरेदी केंद्र सुरू केले. हा निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतल्याचा गाजावाजा केला. शेतकऱ्यांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्याने रेशीम उत्पादक शेतकऱ्यांनी कोष विक्रीसाठी बीडच्या खरेदी केंद्राला पसंती दिली. दररोज बरेच शेतकरी मोठ्या विश्वासाने आपले कोष विक्रीसाठी येथे घेऊन येतात. परंतु माल विकल्यानंतर त्याच पेमेंट ( रक्कम ) मिळण्यास उशीर लागतो अशी तक्रार आहे. याबाबत काही शेतकऱ्यांनी लोकगर्जनान्यूज कडे तक्रार केली. याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी शेतकऱ्यांना देण्यात येणार कोष खरेदी पावतीवरील मो.क्र. ९७३०९९९३३१ वर फोन करुन माहिती घेतली. यावेळी संबंधित व्यक्तीने शेतकऱ्यांना पेमेंट देण्याचा आमचा सात दिवसांचा नियम असल्याचं स्पष्ट सांगितले. याबाबत आम्ही कोष खरेदी केंद्र समोर फलक लावल्याची माहिती दिली. परंतु शेतकरी म्हणतात हा नियम आमच्यासाठी जाचक आहे. आम्ही विकलेले माल व्यापाऱ्यांना रोख मध्ये विकलं जातं असेलतर आम्हाला सात दिवसांचा नियम का? व्यापाऱ्यांकडून पेमेंट उशीरा येत असेलतर मग हे कोष खरेदी केंद्र शेतकऱ्यांच्या हितासाठी चालू केले असेलतर मग त्यांच्या नशिबी पेमेंट साठी प्रतीक्षा का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
* व्यापारी चेक ( धनादेश ) देतात
कोष खरेदी केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी फोनवरून माहिती देताना कोष खरेदी केली की, व्यापारी चेक ( धनादेश ) देतात. त्याच्या क्लियरींग साठी एक-दोन दिवस लागतात. बाहेर राज्यातील बँकेचं चेक असल्यास तीन दिवस लागतात असे सांगितले. मग दो-तीन दिवसात चेकची रक्कम जमा होत असेलतर शेतकऱ्यांसाठी सात दिवस का? असा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे.
* जालना खरेदी केंद्राचे पेमेंट ४८ तासात
रामनगर ( कर्नाटक ) येथे माल विकला की, त्याच रात्री पेमेंट पडतो तर, जालना खरेदी केंद्राला माल विकला की, त्यांचं पेमेंट २४ ते ४८ तासात बँक खात्यात जमा होतं. परंतु बीड खरेदी केंद्रावर माल विकला की, तब्बल सात दिवस पेमेंट येण्याची वाट पहावी लागते. माझं माल २१ तारखेला बीड येथे विकलं आहे. अजून चार दिवस मला पेमेंटची वाट पहावी लागणार आहे. तर दुसऱ्या दोन शेतकऱ्यांचे कोष १९ तारखेला विकलं आहे. त्यांचं अद्याप पेमेंट जमा नाही. हा सात दिवसांचा नियम आमच्यासाठी जाचक ठरत आहे.
धनराज आकुसकर
रेशीम उत्पादक शेतकरी