क्राईम
रुग्णवाहिकेचा अपघात;चालक ठार
परळी : अंबाजोगाई येथे रुग्ण सोडून गंगाखेड कडे परत जात असलेली रुग्णवाहिका पलटी होऊन झालेल्या अपघातात चालक जागीच ठार झाल्याची घटना दगडवाडी जवळ घडली आहे. अपघाताची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी भेट दिली.
गजानन चिलगर असे मयत चालकाचे नाव आहे. ते अंबाजोगाई येथे स्वाराती रुग्णालयात रुग्णाला सोडून परत गंगाखेड कडे चालले होते. दरम्यान परळी-गंगाखेड रस्त्यावर दगडवाडी जवळ एका चढावर चालकाचा रुग्णवाहिकेवरील ताबा सुटला. रुग्णवाहिका रस्त्याच्या खाली उतरून पलटी झाली. यामध्ये चालक गजानन चिलरगे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी भेट दिली. मृतदेह परळी येथील शासकीय रुग्णालयात पाठवून दिला आहे.