रिपाइं पूर्ण ताकदीने डॉ.योगेश क्षीरसागरांच्या पाठीशी
रिपाइंचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांची ग्वाही; क्षीरसागरांची रिपाइं कार्यालयास भेट
बीड (प्रतिनिधी)
दि.९ : बीड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, रिपाइं महायुतीचे उमेदवार डॉ.योगेश क्षीरसागर यांनी रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) कार्यालयास शनिवारी (दि.१५) भेट देवून युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्याशी चर्चा केली. यावेळी युवक प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत महायुतीचे उमेदवार डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या पाठीशी ताकद उभी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
महायुतीचा प्रमुख घटक पक्ष म्हणून रिपाइं पूर्ण ताकदीनिशी डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या पाठीशी उभी राहिल्याने डॉ.योगेश क्षीरसागर यांचे पारडे जड झाले आहे. या बैठकीस महायुतीचे उमेदवार डॉ.योगेश क्षीरसागर, रिपाइंचे युवा प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष इकबाल शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी जैतुल्ला खान, नसीर अन्सारी, नगरसेवक प्रेम चांदणे, अशोक वाघमारे, आर.पी.आय.चे जिल्हा सरचिटणीस राजू जोगदंड, तालुकाध्यक्ष किसन तांगडे, युवक जिल्हाध्यक्ष महेश आठवले, युवक तालुकाध्यक्ष सुभाष तांगडे, शहराध्यक्ष अविनाश जोगदंड, युवक शहराध्यक्ष भैय्या मस्के, महेंद्र वडमारे, धम्मा पारवे, बापू पवार आदी उपस्थित होते. प्रभाकर चांदणे, मायाताई मिसळे, नवनाथ डोळस, राजाभाऊ वक्ते, भास्कर जावळे, मच्छिंद्र निकाळजे, रामेश्वर खळगे, दयानंद उबाळे, नामदेव वाघमारे, भिमराव घोडराव, अविनाश जोगदंड, विजय ओव्हाळ, श्रीमंत जाधव, कैलास जोगदंड, प्रा.आनंद मोरे, भैय्यासाहेब मस्के यांच्यासह रिपाइंच्या जिल्हा कार्यकारणीचे सर्व पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ.योगेश क्षीरसागर यांनी मानले आभार
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजप, शिवसेना, रिपाइं., एस.आर.पी. व मित्रपक्षांच्या महायुतीचा बीड विधानसभेचा अधिकृत उमेदवार म्हणून रिपाइंचे युवक प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी मला जाहीर पाठींबा दिला. याबद्दल मी त्यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांसह आर.पी.आय.पक्षाचे आभार व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया डॉ.योगेश क्षीरसागर यांनी व्यक्त केली.