रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A ) तालुका केज तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा
लोकगर्जनान्यूज
केज : गायरान धारक दिन दलित, भूमिहीन यांच्या न्याय व रास्त मागण्यासाठी युवा रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली केज तालुका अध्यक्ष दीपक कांबळे यांनी दि. १७ ऑक्टोबर मंगळवार रोजी भव्य मोर्चा आयोजित केला आहे.
केज तालुका रिपाइंच्या वतीने युवा रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली तालुका अध्यक्ष दिपक कांबळे यांनी शेतकरी, भूमिहीन ओबीसी झोपडट्टीधारक आणि सुशिक्षित बेकार यांच्या न्याय व रास्त मागण्यासाठी व सरकारला इशारा देण्यासाठी मंगळवार दि. १७ ऑक्टोबर रोजी केज तहसिल कार्यालयावर मोर्चा निघणार आहे. याची माहिती देण्यासाठी राजुजी जोगदंड यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली यावेळी गोवर्धन वाघमारे, शाम वीर, प्रभाकर चांदणे, अविनाश जोगदंड, भास्कर मस्के, निलेश ढोबळे, बाळासाहेब ओव्हाळ, हे उपस्थित होते.
तर या मोर्चात जिल्हा सरचिटणीस राजु जोगदंड, मराठवाडा उपाध्यक्ष मझर खान, जेष्ठ नेते प्रभाकर चांदणे, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष दशरथ सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती आहे. तसेच मराठवाडा संघटक गोवर्धन वाघमारे, जिल्हा सल्लागार उत्तम आप्पा मस्के, जिल्हा उपाध्यक्ष दिपक कांबळे (अंबाजोगाई), जिल्हा संघटक रविंद्र जोगदंड, माजी तालुकाध्यक्ष राहुल सरवदे, शहाराध्य भास्कर मस्के, तालुका सरचिटणीस गौतम बचुटे, जेष्ठ नेते दिलीप बनसोडे, तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब ओव्हाळ, रमेश निशीगंध, विकास आरकडे, युवा रिपाइंचे निलेश ढोबळे, प्रमोद दासुद यांची उपस्थिती राहणार आहे.
या आहेत मागण्या
● बीड जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा.
ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे.
● सन १९९० च्या गायरान जमिनी नियमाकुल करण्याच्या शासनाच्या निर्णयाला २००५ पर्यंत मुदत वाढ देण्यात यावी.
● जि.प.शाळांचे करण्यात येणारे खाजगीकरण रद्द करण्यात यावे व विद्यार्थी पटसंख्येची अट रद्द करून ज्या-त्या शाळांवर शिक्षक नियुक्त करण्यात यावेत.
● केज शहरातील क्रांतीनगर, रमाई नगर येथील झोपडपट्टी वासियांना कचाला पावत्या देण्यात याव्यात.
● केज तालुक्यातील दलित बांधवांना स्मशान भूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात याव्यात.
● राज्य शासनाकडून विविध कार्यालयात करण्यात येणारी कंत्राटी भरती प्रक्रिया रद्द करण्यात यावी.