राष्ट्रीय शालेय बेसबॉल महाराष्ट्राच्या संघात केज तालुक्यातील तीन विद्यार्थी चमकणार
लोकगर्जनान्यूज
केज : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद जालना यांच्या वतीने जालना शहरात जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर सतरा वर्षाखालील मुले व मुलींच्या राज्यस्तरीय शालेय बेसबॉल स्पर्धा नुकत्याच घेण्यात आल्या. या स्पर्धेतून राष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर करण्यात आला. यामध्ये केज येथील तीन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
या स्पर्धा बिलासपूर छत्तीसगढ येथे पार पडणार आहेत.या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्यातील संघात बीड जिल्हा ऊसतोड कामगार विकास मंडळ केज संचलित साने गुरुजी निवासी विद्यालय केज चे जीवन तांदळे, आकांक्षा खरबे, योगिता खरबे या तीन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. सदर खेळाडूंना डॉ. कविता गित्ते,क्रीडा शिक्षक रामदास सानप, रेवन्नथ शेलार यांचे मार्गदर्शन लाभले आहे .
या यशाबद्दल जालना जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, बीड जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती सुहासिनी देशमुख, संस्थाध्यक्ष ॲड. उद्धवराव कराड, राजेश कापसे, सर्व शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचारी यांनी या खेळाडूंचे कौतुक करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.