राष्ट्रवादी काँग्रेस बीडच्या नवीन जिल्हाध्यक्षांची घोषणा; कोणाची लागली वर्णी!

अंबाजोगाई : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून बीड जिल्हाध्यक्ष बदलण्यात आले असून नवीन जिल्हाध्यक्ष म्हणून राजेश्वर चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. आज त्यांना मुंबई येथे प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नियुक्तीपत्र दिले. या निवडीबद्दल राजेश्वर चव्हाण यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्ह्याचा कॅप्टन ( अध्यक्ष ) बदलण्यात येणार अशी काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू होती. परंतु निवड काही होत नसल्याने पक्षाने निर्णय बदलला की,काय? अशी शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु आज ( दि. २५ ) मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात खासदार सुप्रिया सुळे, बीडचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. राजेश्वर चव्हाण हे अंबाजोगाई तालुक्यातील हातोला येथील रहिवासी आहेत. राष्ट्रीय काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस कडून ही जिल्हाध्यक्ष पदाची माळ अंबाजोगाई तालुक्यातील कार्यकर्त्याच्या गळ्यात घातली आहे.