राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण बडतर्फ: नवा अध्यक्ष कोण?
लोकगर्जनान्यूज
बीड : अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत उभी फूट पाडली असून, ते व त्यांचे सहकारी सरकार मध्ये सामील झाले. आमदारांसह अनेक पदाधिकारीही अजित पवार गटाकडे गेले आहेत. परंतु या सर्वांवर शरद पवार गटाकडून कायदेशीर कारवाईला सुरुवात करण्यात आली. यामध्ये बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांच्यासह राज्यातील २१ पदाधिकार्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली. यामुळे आता नवीन जिल्हाध्यक्ष कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. चुक झाली सांभाळून घ्या म्हणून शरद पवारांना साकडं घालणारा अजित पवार गट काय निर्णय घेणार? हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सत्तेच्या मोहात पडून अजित पवार यांनी अनेक आमदार घेऊन सत्तेत सहभागी झाले. आपल्या गटाच्या ९ आमदारांना मंत्री केलं.आमदारांसह राज्यातील अनेक ठिकाणचे जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष असे पक्ष पातळीवरील पदाधिकारीही अजित पवार गटात सामील झाले. परंतु शरद पवार गटाकडून आता या दुसरी चुल मांडून पक्षात उभी फूट पाडणाऱ्यांवर कारवाईला सुरुवात झाली. यापुर्वीच त्या ९ आमदारांवर कायदेशीर कारवाईसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. आता मोर्चा जिल्हाक्षांके वळला असून, पवार गटाकडून राज्यातील जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष २१ पदाधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली. यामध्ये बीडचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांचाही समावेश आहे. यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष पद रिक्त असल्याने नवीन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती कधी होणार? कोणाची वर्णी लागणार याकडे जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.