राज्य शासन २०२० पीक विमा शेतकऱ्यांच्या द्या म्हणून कंपनीला आदेश काढणार! किसान सभेची माहिती

बीड : शेतकऱ्यांना २०२० चा पीक विमा मिळावं म्हणून किसान सभा शेतकऱ्यांना सोबत घेऊन मागील काही महिन्यांपासून आंदोलन करीत आहे. या आंदोलनाची दखल घेऊन राज्य शासन शेतकऱ्यांना २०२० चा पीक विमा द्यावं म्हणून विमा कंपनीला लेखी आदेश काढणार असल्याचे सुत्रांची खात्रीलायक माहिती असल्याचे किसान सभेच्या कृषीवाणी या फेसबुक पेजवर पोस्ट केली आहे.
सन २०२० मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना पीक विमा मिळणे आवश्यक होते परंतु ते मिळालं नाही. त्यामुळे गत वर्षभरा पासून ॲड. अजय बुरांडे यांच्या नेतृत्वाखाली किसान सभा आंदोलन करीत आहे. यासाठी पुणे येथे आंदोलन केले.तसेच सिरसाळा ते जिल्हाधिकारी कार्यालय बीड असा मोर्चा काढला होता. वेळोवेळी आंदोलने व कृषी मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर, राज्य सरकार अधिकृतरित्या पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांना २०२० चा विमा द्यावा असा लेखी आदेश काढणार असल्याच खात्रीलायक वृत्त सूत्रांनी किसान सभेने सोशल मीडियावर सांगितले आहे.
हे खर असेल तर २०२० खरीपचा विमा मिळवण्यासाठीची एक लढाई किसान सभेने व शेतकऱ्यांनी जिंकल्याचे म्हटले आहे.तर, एवढ्यावरच न थांबता जर आदेश नाही निघाला तर १७ जानेवारीच स्थगित केलेलं आंदोलन लवकरच काही दिवसात करण्यात येईल व खात्यात पैसे पडणार नाहीत तोपर्यंत किसान सभा शांत बसणार नाही असे किसान सभेचे नेते ॲड. अजय बुरांडे यांनी म्हटले आहे. पीक विमा कंपनीला आदेशीत करणार पत्र प्राप्त झाल्यावर शेतकऱ्यांना या बाबतीत अवगत करुन सविस्तर माहिती शेतकऱ्यांना देण्यात येईल असेही ॲड. अजय बुरांडे यांनी सांगितले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या २०२० पीक विमा बाबतीत आशा पल्लवित झाल्या आहेत.