राज्यातील कोतवालांची पगार दुप्पट वाढली; महसूल मंत्र्यांची माहिती

लोकगर्जनान्यूज
गावगाड्यातील कोतवाल या अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तीला अत्यंत तोकड मानधन होते. परंतु यामध्ये वाढ करत तब्बल मानधनात दुप्पट वाढ करण्यात आली असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
कोतवाल हा राजा महाराजांच्या काळा पासूनचे गावगाड्यातील म्हत्वाची व्यक्ती असून जुन्या काळातील कोतवाल म्हणजे गावातील पोलीस अधिकारी व त्याचा तसा दरारा होता. कोतवालला पाहून अनेकांची घाबरगुंडी उडत असे, असे अनेक वृद्ध खेड्यात सांगतात. हा कोतवाल गावपातळीवर मानधनावर काम करणारा एक म्हत्वाचा कर्मचारीच असतो. गावात कोणी अधिकारी आला त्याची सेवा तसेच सांगतील ते काम करणे, गावात शांतता ठेवणं, काही अनुचित घटना घडली तर प्रशासनाला माहिती देणे, अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल होत नाहीत तोपर्यंत घटनास्थळी थांबणे, शासकीय कोणतीही माहिती गावातील नागरिकांपर्यंत पोहोचविणे असे अनेक कामे कोतवालाची जबाबदारी. यासाठी कोतवालाला मानधन मिळतो.
कोतवालची नियुक्ती कोण करतो?
यासाठी शासनाकडून कोतवाल नियुक्तीची अधिकृत जाहिरात देऊन अर्ज मागवून घेतले जाते. त्यातून नियमाप्रमाणे चाचणी घेऊन मा. तहसीलदार ( तालुका दंडाधिकारी ) कोतवालाची नियुक्ती करतात.
कोतवालांना पुर्वी किती होते मानधन?
कोतवालला पुर्वी शासनाकडून 7 हजार 500 रू. इतकं मानधन देण्यात येत होते. यामुळे या महागाईच्या काळात हे मानधन खूपच तोकडं ठरत असल्याने मानधन वाढीची मागणी करण्यात येत होती ती अखेर आज मान्य करण्यात आली.
आता किती झाली वाढ?
कोतवाल मानधन वाढीचा निर्णय घेत शासनाने 7 हजार 500 वरुन 15 हजार मानधन करण्याचा निर्णय घेत चक्क दुप्पट वाढ करण्यात आली. यामुळे कोतवाल बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.
वाढीव अनुदान कधीपासून मिळणार?
अनुदान वाढीची घोषणा झाली व वाढही समाधान कारक झाली. पण ही पदरात कधी पडणार असा प्रश्न मनात निर्माण झाला असेल तर हे अनुदान राज्यातील सर्व कोतवालांना 1 एप्रिल 2023 पासून लागू होणार आहे?