
लोकगर्जनान्यूज
केज : सिल्लोड येथे आयोजित राज्यस्तरीय कृषी महोत्सव -२०२३ दि. १ जानेवारी ते १० जानेवारी पार पडणार आहे. या महोत्सवाचा केज तालुक्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी यांनी केले आहे.
या महोत्सव म्हणजे सांस्कृतिक,क्रिडा व कृषी असा पार पडणार आहे. यामध्ये नामवंत गायक, प्रसिद्ध फू बाई फू, चला हवा येऊ द्या, सुनील ग्रोवर सह आदी हास्य कलावंत उपस्थित रहाणार आहेत. तसेच भव्य क्रिकेट स्पर्धा, शुटिंग बॉल, फुटबॉल, कब्बडी, कुस्ती खुल्या स्पर्धा, राज्यस्तरीय शंकर पट, ऑल इंडिया मुशायरा, सर्व रोगनिदान व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हा शेतकऱ्यांसाठी मनोरंजन, शेती विकिस सह आरोग्य असा त्रिवेणी संगम महोत्सव ठरणार आहे. ही सर्व कार्यक्रम १ जानेवारी ते १० जानेवारी असे दहा दिवस चालणार आहेत. या कृषी महोत्सवाचा केज तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केज तालुका कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलं आहे.